bangladesh hikes fuel prices by 50 pc highest in history since formation  
ग्लोबल

बांगलादेशात इंधनाच्या किमतीत ५१ वर्षांतील सर्वाधिक वाढ, काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

Bangladesh Hikes Fuel Prices : बांगलादेशमध्ये इंधनाच्या किमती एकाच वेळी तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या देशाच्या इतिहासातील 1971 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने अचानकपणे इंधनाच्या किमतीत एवढी वाढ केल्यानंतर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडिओंमध्ये लोक पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेश सरकारने शनिवारपासून इंधनाच्या दरात ही वाढ जाहीर केल्याचे सांगण्यात आले. याआधी शुक्रवारी रात्री पेट्रोल पंपांबाहेर लोकांनी इंधन खरेदीसाठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार बांग्लादेशची राजधानी ढाका शहरातील मोहम्मदपूर, आगरगाव, मालीबाग आणि इतर भागात पेट्रोल पंपांवर एवढी गर्दी झाली की पेट्रोलच्या पुरवठ्यात अडथळा येत होता. यानंतर रात्री उशिरा पंपांवर पुरवठा पुन्हा सुरू झाला तेव्हा मात्र, रात्री 12 नंतर पेट्रोलचे दर हे 51.7 टक्क्यांनी वाढले होते.

बांग्लादेशच्या ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की आता देशात एक लिटर पेट्रोलची किंमत 135 टका पर्यंत वाढलेली असेल, जी पूर्वीच्या 89 टका किंमतीपेक्षा 51.7 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एक निवेदन जारी केले की तेलाच्या कमी किमतींमुळे फेब्रुवारी ते जुलै दरम्यान ₹8014.51 कोटींचे नुकसान झाले आहे.

जगभरात तेलाच्या किमती का वाढत आहेत?

रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनाव्हायरसमुळे जगभरात इंधनाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे. पण पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे मॉस्कोमधून होणारी तेल निर्यात लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. याशिवाय पश्चिम आशियातील तेल उत्पादक ओपेक देशांनीही इंधनाचे उत्पादन वाढवलेले नाही, त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. याचाच फटका बांग्लादेशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीना बसला आहे. मात्र, यामुळे सामान्यांच्या खिशावर भार वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT