Microsoft Co Founder Bill Gates Resigns From Board Of Directors 
ग्लोबल

एलाॅन मस्कच्या ट्विटर खरेदीवर बिल गेट्स म्हणाले - ट्रॅक रेकाॅर्ड चांगला,पण !

ट्रॅक रेकाॅर्ड चांगला,पण !

सकाळ डिजिटल टीम

न्यूयाॅर्क : मायक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स म्हणाले, की एलाॅन मस्क ट्विटरची आणखीन वाईट अवस्था करतील. बुधवारी (ता.चार) द वाॅल स्ट्रिट जनरल सीईओ समीटमध्ये बिल गेट्स यांनीवरील वक्तव्य केले. त्यांना विचारले गेले होते, की ट्विटरची मालिकी हक्क एलाॅन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेल्यावर कंपनीच्या गुणवत्तेवर काय परिणाम होईल? यावर उत्तर देताना बिल गेट्स (Bill Gates) म्हणाले, एलाॅन मस्क यांचा ट्रॅक रेकाॅर्ड चांगला आहे. मात्र ते ट्विटरची स्थिती बदलू शकतात. अद्याप ते काय करणार हे स्पष्ट झालेले नाही, असे बिल गेट्स म्हणाले. (Bill Gates Questions Elon Musk Intentions On Twitter Take Over)

एलाॅन मस्क यांच्या इतर कंपन्यांमध्ये ट्रॅक रेकाॅर्ड चांगला राहिलेला आहे. विशेषतः टेस्ला आणि स्पेस एक्समध्ये त्यांची कामगिरी उत्तम आहे. पुढे ते म्हणाले, मला वाटत की मस्क यांनी या दोन कंपन्यांमध्ये चांगल्या अभियंत्यांची टीम आणून खूप चांगले काम केले गेले आहे. मात्र यावेळेस आम्हाला शंका आहे, की पुढे काय होईल ? मात्र आपल्याला आपल डोकं खुल ठेवायला हवं आणि एलाॅन मस्कला कमी लेखून चालणार नाही. याच कार्यक्रमात बिल गेट्स यांनी ट्विटर (Twitter) खरेदी मागे एलाॅन मस्कच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यांनी म्हटले होते, की त्यांना सेन्साॅरशिपशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव मिळावा यासाठी त्यांनी ट्विटर खरेदी केले आहे. बिल गेट्स म्हणाले, की एलाॅन मस्क ट्विटर खरेदी करण्यामागे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण सांगत आहेत, ते तर्कसंगत आहे का ? कोरोना काळात मस्कने अनेक वेळास चुकीची माहिती ट्विटवर दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT