Bill Gates Sakal
ग्लोबल

Bill Gates Resume : जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा CV पाहिलाय का?

चांगली नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकजण स्वतःचा एक चांगला रेझ्युमे तयार करत असतो.

सकाळ डिजिटल टीम

Trending Resume : चांगली नोकरी (Job) मिळविण्यासाठी प्रत्येकजण स्वतःचा एक चांगला रेझ्युमे (Resume) तयार करत असतो. कारण यामधूनच संबंधित कंपनीला रेझ्युमेमधूनच नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या व्यक्तीची पात्रता आणि अनुभवांबद्दल माहिती देण्याचे काम करत असते. जर, चांगला रेझ्युमे तयार केलेला असेल तर, तुमच्याकडे बघण्याचा कंपनीचा दृष्टिकोन बदलू शकतो. दरम्यान, जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या बिल गेट्स (Bill Gates) सध्या त्यांच्या 48 वर्षांपूर्वी तयार केलेल्या गोष्टीमुळे ट्रेन्डिंगला असून, 48 वर्षांपूर्वी चांगल्या नोकरीसाठी गेट्स यांनी हा रेझ्युमे तयार केला होता. सध्या हा रेझ्युमे सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात ट्रेन्ड होत आहे. (Bill Gates Resume News In Marathi)

गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षांचा रिझ्युमे लिंकडिन (Linkdin) या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केला आहे. रेझ्युमे शेअर करताना बिल गेट्स यांनी लिहिले की "तुम्ही जर नुकतेच पदवीधर झालेले असाल किंवा कॉलेजमधून पास होऊन बाहेर पडला असाल, तर मला खात्री आहे की, तुमचा रेझ्युमे 48 वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूपच चांगला दिसत असेल." (Best Resume For Job)

बिल गेट्स यांच्या रेझ्युमेमध्ये काय?

बिल गेट्स यांनी शेअर केलेल्या रेझ्युमेवरून असे दिसून येते की, गेट्स यांनी डेटाबेस मॅनेजमेंट, ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स यासह अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.याशिवाय या रिझ्युमेमध्ये बिल गेट्स यांनी फोरट्रान, COBOL, ALGOL, BASIC आणि इतर अनेक प्रोग्रामिंग भाषांमधील त्यांचे प्राविण्य नमूद केले आहे. याशिवाय यामध्ये त्यांच्या अनुभवांचाही उल्लेख आहे. ज्यावरून त्यांनी 1973 मध्ये TRW सिस्टम्स ग्रुप्समध्ये सिस्टम प्रोग्रामर म्हणून काम केले होते. (Bill Gates Education)

गेटस् यांच्या रेझ्युमेवर लाखो कमेंट्स

दरम्यान, गेट्स यांनी लिंकडिनवर रेझ्युमे पोस्ट केल्यानंतर हजारो वापरकर्त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांना 48 वर्षांपूर्वी बिल गेट्स यांची एवढी मोठी पात्रता पाहून आश्चर्याचा धक्का बसला असून, अनेकांना गेट्स यांचा 48 वर्षे जुना रेझ्युमे आजच्या तुलनेत खूप प्रभावी वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी! 'या' तारखेला येणार PM किसानचा २१ वा हप्ता, पण ही चूक केल्यास मिळणार नाहीत पैसे

'कांतारा चॅप्टर १' अजूनही पाहिला नाही? आता घरबसल्या पाहता येणार; 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

'लता मंगेशकर मात्र एकच घडली'... मीना मंगेशकर-खडीकर यांच्या लेखणीतून दीदीचा खडतर प्रवास आणि अनोख्या आठवणी!

Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे? वाचा एका क्लिकवर

Fake Crowd Videos: महत्त्वाची बातमी! स्थानकांवरील गर्दीचे जुने व्हिडिओ व्हायरल कराल तर खबरदार... रेल्वे प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT