canada 
ग्लोबल

कॅनडामध्ये लावण्यात आलेले मोदींचे होर्डिंग एका दिवसात हटवले; जाणून घ्या कारण

सकाळन्यूजनेटवर्क

टोरंटो- भारताने कोरोनावरील लसीचा पुरवठा कॅनाडाला केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी तेथील भारतीय वंशाच्या समुदायाने मोदींचे फोटो असणारे होर्डिंग लावले होते. पण, एका दिवसातच हे होर्डिंग्ज हटवण्यात आले आहेत. 'हिंदुस्तान लाईव्ह'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारत अनेक देशांना कोरोना लशीचा पुरवठा करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख लशीचे डोस कॅनडात पाठवले होते. यासंदर्भात ट्रुडो यांनी मोदींचे आभार मानले होते. त्यानंतर कॅनडातील भारतीय समुदायाने ग्रेटर टोरंटोमध्ये होर्डिंग लावून मोदींचे आभार मानले होते. पण, या होर्डिंगसंबंधी स्थानिकांकडून तक्रारी येत असल्याने हे होर्डिंग एकाच दिवसात वापस घेण्यात आले आहेत. 

कॅनडातील भारतीय समुदायाने ग्रेटर टोरंटोमध्ये 9 होर्डिंग लावले होते. यासाठी त्यांनी एका जाहीरात कंपनीशी करार केला होता. पण, मोदींचा फोटो असल्याने स्थानिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. होर्डिंग्जमध्ये पंतप्रधान मोदींना धन्यवाद देण्यात आले होते. तसेच कॅनडा आणि भारताच्या मैत्रीचा उल्लेख करण्यात आला होता. हे होर्डिंग पाच आठवडे ठेवण्याचा करार झाला होता. पण, गुरुवारी मोदींचे होर्डिंग लावणाऱ्या हिंन्दू फोरम कॅनाडाला आऊटफ्रंट मीडियाने एक मेल पाठवला आहे. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हे होर्डिंग हटवण्यात आले, असं मेलमध्ये सांगण्यात आलंय.

कॅनडामध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगवर पंतप्रधान मोदींच्या फोटोसोबत लिहण्यात आलं होतं की, कॅनडाला कोविड लस देण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारताकडून कॅनडाला लसीचे 20 लाख खुराक दिले जाणार आहेत. यासाठी कॅनडाने भारताचे आभार मानले आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरवातीला जस्टीन ट्रुडो यांच्यासोबत बातचित केली होती. या दरम्यान त्यांनी ट्रुडो यांना आश्वासन दिलं होतं की, भारत कॅनडाच्या कोरोना लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये मदत करेल. तर ट्रुडो यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, जर जगात कोरोना विरोधातील लढा यशस्वी झाला तर तो भारताच्या औषध निर्मितीच्या क्षमतेमुळेच होईल. 

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार अद्यापही सुरुच आहे. गेल्या वर्षी याच काळात कोरोनाने जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. मात्र, आता एका वर्षानंतर जगभरात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. भारतानेही दोन लसींना मान्यता दिली असून जगातील सर्वांत मोठ्या लसीकरणाची मोहीम सध्या भारतात सुरु आहे. भारताने इतर देशांना देखील लसीचा पुरवठा केलाय. भारताने नेपाळ, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि कॅनडापर्यंत अनेक देशांना कोरोना लसीचा पुरवठा करुन जगभरात आपल्या मानवतेचं दर्शन घडवलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: इशान किशनवर फायनलपूर्वी कोसळलेला दु:खाचा डोंगर! जगज्जेता झाल्यानंतर केला खुलासा, 'मी तिच्यासाठीच चांगला खेळलो...'

PPF Investment: PPF मध्ये गुंतवणूक फायदेशीर की तोट्याची? टॅक्स बचत आणि रिटर्नचं खरं गणित जाणून घ्या

Mumbai News: मुंबईचा कायापालट होणार! महापौर रितू तावडे यांचा ‘१०० दिवसांचा मास्टर प्लॅन’ तयार

इराणमध्ये आकाशातून पडतंय तेल, हवा विषारी; लोकांना घरातच कोंडून घेण्याची वेळ, इस्रायलच्या हल्ल्यानंतर भीषण परिस्थिती

Bavdhan Bhairavnath Yatra : 10 बैलजोड्यांनी ओढला 40 फुटी रथ! बावधनच्या बगाड यात्रेचे हे खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? 16 वर्षांपूर्वीचा 'तो' नवस फेडण्यासाठी...

SCROLL FOR NEXT