America 
ग्लोबल

अमेरिकेत जन्मदरात झाली घट; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेत गेल्या वर्षी बाळांच्या जन्माचे प्रमाण घटल्याने जन्मदरात ३५ वर्षांत प्रथमच मोठी घट नोंदविली गेली. देशात २०१९ मध्ये ३७ लाख ५० हजार नवजात अर्भके जन्माला आली. हे प्रमाण याआधीच्या वर्षापेक्षा एक टक्क्याने कमी आहे.

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

प्रजनन दर घसरला
‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन्स नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स’ने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. १५ ते ४४ वर्ष वयोगटातील एक हजार महिलांमागे प्रजनन दर २ ते ५०.२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. अमेरिकेतील जन्मदाराची नोंद ठेवण्यास सरकारने १९०९ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून जन्मदराचा ही नीचांक आहे.

आर्थिक असुरक्षितता
अमेरिकेत २००७-२००९मध्ये महामंदी होती, तेव्हापासून येथील प्रसूतींची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली होती. देशातील अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान झाली तरी बाळ जन्माला घालण्याच्या मानसिकतेत फारसा बदल झाला नाही. १९८१ ते १९९६ मध्ये जन्माला आलेल्या पिढीला कौटुंबिक व्यवस्थेत फारसे स्वारस्य नसल्याचे दिसते. अर्थतज्ज्ञांच्या मते याचे कारण म्हणजे आधीच्या पिढीत आर्थिक स्थैर्य होते. मात्र या पिढीला आर्थिक असुरक्षिततेची चिंता भेडसावत असते. याचा परिणाम जन्मदरात घट होण्यात झाला आहे, असे ऱ्होड आयर्लंड विद्यापीठातील प्राध्यापक मेलानी ब्राशेर यांनी सांगितले.

सध्या कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीने अमेरिकेची अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. या मुळे येत्या काळात येथील जन्मदर आणखी घसरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यामुळे लोकसंख्येतील वयोगटातील समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
- मेलानी ब्राशेर,  साहाय्यक प्राध्यापक, ऱ्होड आयर्लंड विद्यापीठात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT