Body of Chinese ambassador who died in Israel returns home 
ग्लोबल

धक्कादायक : चीनच्या राजदूतांचा इस्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू

वृत्तसंस्था

तेल अविव : चीनच्या इस्रायलमधल्या राजदुतांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या तेल अविवमध्ये चीनचे राजदूत डु-वेई यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डु-वेई यांचा मृतदेह त्यांच्या बेडवर आढळला. डु-वेई यांच्या मृत्यूचं कारण मात्र, अजून समजलेलं नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डु-वेई यांचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉमपिओ यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर एका आठवड्यामध्येच डु वेई यांचा मृत्यू झाला आहे. या दौऱ्यामध्ये माईक पॉमपिओ यांनी इस्रायलला चीनच्या गुंतवणुकींवर मर्यादा आणायला सांगितलं होतं. या प्रकरणानंतर 'साथीच्या रोगांसोबतच षडयंत्र आणि बळीचा बकरा बनवण्याची मानसिकता येते, याला इतिहास साक्ष आहे,' अशी सूचक प्रतिक्रिया चीनचे इस्रायलमधले राजदूतांचे प्रवक्ते वँग योंगजून यांनी दिली. 
--------
१९९९पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळावर एक नजर
--------
भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचं धाडस
--------
सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार
---------
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यामध्येच ५७ वर्षांच्या डु-वेई यांची चीनचे राजदूत म्हणून इस्रायलमध्ये नियुक्ती झाली होती. त्याआधी डु-वेई युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. डु-वेई यांच्या कुटुंबात त्यांची बायको आणि मुलगा आहे, पण हे दोघं वेई यांचा मृत्यू झाला तेव्हा इस्रायलमध्ये नव्हते. तेल अविव जवळ असलेल्या हर्झलियामध्ये डु-वेई राहत होते. काही दिवसांपूर्वी राजदूतांच्या वेबसाईटवर डु-वेई यांनी चीन आणि इस्रायलच्या संबंधांचं कौतुक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT