global news sakal
ग्लोबल

बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना देतोय 63 लाखांचं पॅकेज अन् वर्क फ्रॉम होम

ही कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाचा 63.7 लाख रुपये पगार आणि घरुन काम करण्याची मुभा देत आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाला मनासारखा निवांत जॉब आणि मनासारखं पगार हवा असतो पण अनेकदा या दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे कठीण आहे. पण सध्य आम्ही तुम्हाला सांगितलं की असा जॉब तुम्हाला मिळू शकतो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

सध्या अमेरिकेतल्या एका कंपनीची खुप चर्चा होत आहे. कारण ही कंपनी कर्मचाऱ्यांना वर्षाचा 63.7 लाख रुपये पगार आणि घरुन काम करण्याची मुभा देत आहे. या कंपनीच्या बॉसने हि घोषणा केली आहे. सध्या हा बॉस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून असा बॉस प्रत्येकाला मिळावा, अशा प्रतिक्रिया येत आहे. (Boss Dan Price are paid Rs 63 lakhs annually and are given the flexibility to work from home)

ग्रॅव्हिटी पेमेंट्स (Gravity Payments) नावाची ही एक क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनी असून त्याचा मालक डॅन प्राइस (Dan Price) कर्मचाऱ्यांना वर्षाचा 63.7 लाख रुपये पगार देतोय. याशिवाय कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सारख्या अन्य सुविधाही आहे.

डॅन प्राइसने या आधीही आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याकरीता स्वत:चे घर विकले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्याचा पगार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार सारखाच आहे. कर्मचाऱ्याला भरघोस पगार देण्यावरुन त्याच्यावर सातत्याने टीका केली जाते.

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. कर्मचाऱ्यांना एवढा पगार देणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे तर काही जण असा बॉस प्रत्येकाला मिळावा, अशी प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT