Boy Participated In one chip challenge dies by heart attack in Massachusetts in USA| Paqui Chip  Esakal
ग्लोबल

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Paqui Chip: किरमिजी रंगाची कवटी आणि "अत्यंत उष्णता" असे लेबल असलेल्या शवपेटीच्या आकाराच्या बॉक्समध्ये हे चिप्स पॅक केले जातात.

आशुतोष मसगौंडे

सोशल मीडिया चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या एका अमेरिकन किशोरवयीन मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील हॅरिस वोलोबा नावाच्या 14 वर्षीय मुलाचे सप्टेंबरमध्ये "वन चिप चॅलेंज" मध्ये भाग घेतल्यानंतर निधन झाले होते. ज्यात त्याने कॅरोलिना रीपर आणि नागा वायपर मिरचीसह तयार केलेली चिप्स खाल्ले होते. (Boy Participated In one chip challenge dies by heart attack in Massachusetts in USA)

वृत्तसंस्था एएफपीला मिळालेल्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार, परिसरातील मुख्य वैद्यकीय परीक्षकांनी निष्कर्ष काढला की, हॅरिसने मिरचीचा अर्क असलेल्या कॅप्सॅसिनचे अति प्रमाण असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला.

त्याच्या निधनानंतर काही दिवसांनी Paqui ने स्टोअरच्या शेल्फमधून त्याचे हे प्रोडक्ट हटवले होते. किरमिजी रंगाची कवटी आणि "अत्यंत उष्णता" असे लेबल असलेल्या शवपेटीच्या आकाराच्या बॉक्समध्ये हे चिप्स पॅक केलेले होते.

दरम्यान अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवरून दावा करण्यात येत आहे की, या चॅलेंजमुळे कॅलिफोर्नियातील तीन तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मिनेसोटामध्ये आणखी सात जण आजारी पडले आहे.

या मसालेदार चिप्सची उत्पादक कंपनी Paqui ने सांगितले, हॅरिस वोलोबाच्या मृत्यूमुळे ते खूप दुःखी झाले आहेत. या मुलाच्या मृत्यूनंतर कंपनीने ते उत्पादन बाजारातून हटवले आहे.

हे चिप्स लाल कवटीच्या शवपेटीच्या आकाराच्या बॉक्समध्ये पॅक केले जातात आणि त्यावर 'अत्यंत उष्णता' असे लिहिले जाते.

याच्या एका पॅकेटची किंमत $10 आहे. कंपनीने मुलांना चिप्स न खाण्याचा सल्ला दिला आहे, तरी अनेक किशोरवयीन मुले अजूनही 'स्पायसी चिप चॅलेंज'मध्ये भाग घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News:मुंबई मेट्रो-3: दिव्यांग प्रवाशांना करावा लागतोय त्रासाचा सामना

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT