brave brother and sister raksha bandhan photo viral  
ग्लोबल

बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ आला पुन्हा चर्चेत...

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: सोशल मीडियावर बहिण-भावाचा फोटो व्हायरल होत असून, जगभरातून भावाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. कारण, सहा वर्षीय भावाने कुत्र्याच्या तावडीतून बहिणीला वाचवले आहे. बहिणीला वाचवताना कुत्रा चावला असून, तब्बल 90 हून अधिक टाके पडले.

अमेरिकेतील व्योमिंग प्रांतात ही घटना घडली. ब्रिजर वॉकर हा आपल्या बहिणीसोबत खेळत होता. यावेळी शेफर्ड मिक्स या कुत्र्याने बहिणीवर हल्ला केला. ब्रिजर धाडस करून कुत्र्याच्या अंगावर गेला आणि बहिणीला सुखरूप वाचवले. पण, कुत्र्याने त्याच्या चेहऱयाचा चावा घेतला. ब्रिजरच्या चेहऱयावर 90 टाके पडले आहेत. बहिण-भावाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. ब्रिजर आता बरा झाला आहे. पण, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने राखी बांधल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ब्रिजरची काकी निकोल यांनी बहिण-भावाचा रक्षाबंधन साजरा करतानाचे छायाचित्र इन्टाग्रावर अपलोड केले आहे. शीर्षक देताना लिहीले आहे की, 'ब्रिजरची गोष्ट सर्वांना प्रेरणादायी वाटली. त्याच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे. यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. बहिणीचे भावावरील प्रेम यातून प्रतित होते. भाऊ यावेळेस बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देत असतो. आज आम्हाला रक्षाबंधन साजरा करायला मिळाला याचा आनंद फारच वेगळा आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT