Japanese man becomes a dog  सकाळ
ग्लोबल

12 लाख खर्च करुन माणूस बनला चक्क कुत्रा

या व्यक्तीने चक्क 12 लाख रुपये खर्च करुन स्वत:ला कुत्रा बनवून घेतले

सकाळ डिजिटल टीम

माणसाच्या डोक्यात कधी काय येईल याची शाश्वती नाही. माणसाची कल्पनाशक्ती हीच त्याची ताकद आहे पण कधी कधी ज्या गोष्टी आपण कल्पनाही करु शकत नाही त्या गोष्टी माणूस करुन दाखवतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे जपानमधील एक व्यक्ती.

या व्यक्तीला (Japanese Man) सतत आपण कुत्रा (Dog) व्हावे असे वाटत असे. त्यामुळे या व्यक्तीने चक्क 12 लाख रुपये खर्च करुन स्वत:ला कुत्रा बनवून घेतले. टोको असे या व्यक्तीचे नाव आहे. टोकोने आपल्या ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनलाय. (By spending 12 lakh rs Japanese Man Becomes Dog)

एक जपानमधील कुत्र्याची प्रजाती कुली आहे. या कुलीचे रूप या माणसाने घेतले आहे. तर जेपेट (Zeppet) नावाच्या कंपनीने या व्यक्तीच्या रूपात बदल केला. जेपेट चित्रपट, व्यावसायिक मनोरंजन आणि इतरही काही सेवा देते. जपानमधील पात्राच्या भूमिकेनुसार वेषभुषाही करते.

खरं तर या व्यक्तीची इच्छा होती की आपण आयुष्यात एकदा तरी कुत्र्यासारखे व्हायचे. त्याने १२ लाख खर्च करुन त्याची इच्छा पुर्ण केली. हा वेष बनविण्यासाठी जवळपास 40 दिवस लागले.सध्या या जपानच्या व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT