Sleep
Sleep 
ग्लोबल

स्वप्नात दिसतात मृत लोक; रहस्यमय आजारानं नागरिक त्रस्त

नामदेव कुंभार

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीसोबत (Coronavirus) लढत आहे. कोरोना महामारीनं लाखो जणांचे बळी घेतले आहेत. या संकटाचा सामना करत असतानाच कॅनडामध्ये सध्या एक रहस्यमय मेंदूच्या आजारानं (Brain Syndrome) डोकं वर काढलं आहे. या आजारामुळे कॅनडामधील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या रहस्यमय मेंदूच्या आजाराचे कॅनडामध्ये आतापर्यंत 48 रुग्ण मिळाले आहेत. या रुग्णांमध्ये निद्रानाश (Insomnia), अंग दुखणे (Limb Dysfunction) आणि मतिभ्रम (Hallucination) यासारखी लक्षणं दिसून आली आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, या रहस्यमय मेंदूच्या आजाराचे रुग्ण कनाडातील न्यू ब्रंसविक (New Brunswick) या प्रांतात मिळाले आहेत. या रुग्णांना स्वप्नात मेलेले लोक दिसतात. त्यानंतर या रुग्णांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाल आहे. हा रहस्यमय आजार नेमका कोणता आहे? यावर सध्या संशोधन सुरु आहे. यासाठी कॅनडातील दिग्गज न्यूरोलॉजिस्ट दिवसरात्र काम करत आहेत.

काही शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी असा दावा केलाय की, हा रहस्यमय आजरा स्मार्टफोन टॉवरच्या रेडियशनमुळे (Cellphone Towers Radiation) पसरत आहे. तर काही तज्ज्ञांनी या आजाराचं कारण कोरोना लस असल्याचेही सांगितलं आहे. या दोन्ही दाव्याचं अद्याप कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

काही शास्त्रज्ञांनी सांगितलं की, कॅनडामध्ये हा आजार सहा वर्षांपूर्वी पसरण्यास सुरु झाला होता. या आजारांनं अनेकांना ग्रासलं होतं. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पण मागील दीड वर्षांपासून कोरोना माहारीचा प्रादुर्भाव सुरु झाला, त्यामुळे लोक आणि आरोग्य आधिकाऱ्यांचं या रहस्यमय आजाराकडे दुर्लक्ष झालं. हीच सर्वात मोठी चूक झाली आहे.

दरम्यान, इतका कालावधी गेल्यानंतरही वैज्ञानिकांकडे या रहस्यमय आजाराचं नावही नाही. लोकांमध्ये या आजारांबद्दल अनेक गैरसमज आहेत. नैसर्गिक आहे का? संसर्गजन्य आहे का? अनुवंशिक आहे? मासांहरातून याचा प्रादुर्भाव होतो का? नेमकं या आजाराचं कारण काय? यासारखे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. मात्र, संशोधकांकडे कोणतेही उत्तर नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT