trump family 
ग्लोबल

संसदेत हिंसाचार सुरू असताना ट्रम्प कुटुंबीय सेलिब्रेशनमध्ये मग्न; व्हायरल व्हिडिओमुळे संताप

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी अभूतपूर्व असा गोंधळ घातल्यानंतर आता उरलेला काही दिवसांचा कार्यकाळ ट्रम्प पूर्ण करू शकतील की नाही असा प्रश्न आहे. समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता असून आता आणखी एका व्हिडिओमुळे ते कचाट्यात सापडू शकतात. इटलीची राजधानी रोम जळत असताना सम्राट निरो फिडेल वाजवण्यात दंग झाला होता. आता तशीच काहीशी कृती ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांकडून घडल्याचं समोर आलं आहे. ज्यावेळी ट्रम्प समर्थक तोडफोड आणि मारहाण करत होते त्यावेळी ट्रम्प यांचे कुटुंबिय टीव्हीवर हे सर्व लाइव्ह बघत होते. याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ट्रम्प यांच्या मुलानेच तो शूट केला आहे. 

व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्यासह त्यांची मुलगी इव्हांका दोन तीन वेगवेगळ्या टीव्ही स्क्रीनवर कॅपिटॉलमध्ये होत असलेला हिंसाचार पाहताना दिसतात. बँकग्राउंड म्युझिकही सुरू असून यात ट्रम्प आणि इव्हांका गंभीर वाटतात तर त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर, गर्लफ्रेंड किम्बर्ली आणि चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज आनंदी दिसतात.

गुरुवारी अमेरिकेच्या संसदेत आत आणि बाहेर झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि महिलेचा समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू शुक्रवारी झाला. 

ऑस्ट्रेलियन संकेतस्थळ news.com.au ने ट्रम्प कुटुंबियांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्रम्प कुटुंबियांशिवाय आणखी काही लोक या व्हिडिओमध्ये दिसतात. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि त्याची गर्लफ्रेंड किम्बर्लीसुद्धा आहेत. याशिवाय काही घोषणा ऐकू येतात. ट्रम्प यांच्याकडून ही लढाई सुरु ठेवण्यास सांगितलं जातं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हातात एक टोपी असून त्यावर मेक अमेरिका ग्रेट अगेन असंही लिहिलं आहे. 

ट्रम्प यांनी गुरुवारी इलेक्टोरल कॉलेज मतांच्या मोजणीआधी भाषण दिलं होतं. यामध्ये समर्थकांना पराभव स्वीकारू नका असं म्हटलं होतं. व्हायरल व्हिडिओत ट्रम्प यांचा मुलगा समर्थकांच्या कामावर आनंदी असल्याचं म्हणतो. तर त्याची गर्लफ्रेंड किम्बर्ली आपण योग्य मागणीसाठी लढू शकतो असं म्हणताना दिसते. ट्रम्प कुटुंबिया सेल्फीसुद्धा काढतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा अत्यंत नीच प्रकार असल्याचं मत युजर्सनी व्यक्त केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT