sebastian-pinera.jpg 
ग्लोबल

विना मास्क सेल्फी घेणं राष्ट्राध्यक्षांना पडलं महागात, अडीच लाखांचा दंड

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने त्रस्त केले आहे. या विषाणूला निपटण्यासाठी बहुतांश देशात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे आहे. याचदरम्यान दक्षिण अमेरिकेतील देशाच्या राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी मास्क विना फिरणे महागात पडले आहे. या बेजबाबदारपणासाठी त्यांना सुमारे अडीच लाखांचा दंड भरावा लागला आहे. 

'बीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार, चिलीचे राष्ट्राध्यक्ष सॅबेस्टियन पियनेरा यांनी एका महिलेसमवेत मास्क न घालता सेल्फी घेतली होती. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कोरोना विषाणू नियम मोडल्याबद्दल 3500 डॉलरचा (सुमारे 2,57,624 रुपये) दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पियनेरा यांनी या फोटोबद्दल माफीही मागितली होती. 

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठीचे नियम मोडल्याचे राष्ट्राध्यक्षांनी मान्य केले आहे. ते म्हणाले की, काचागुआमध्ये मी माझ्या घराजवळ फेरफटका मारत असताना एक महिला माझ्याकडे आली आणि तिने सेल्फी घेण्याची विनंती केली. त्यावेळी मी मास्क घालायला हवा होता. पण मी तसाच फोटो काढला. दरम्यान, चिलीत सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क घालणे सक्तीचे आहे. तिथे विना मास्क असाल तर मोठा दंड भरावा लागतो. 

चिलीमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागतो. तसेच कारागृहातही जावे लागण्याची शक्यता आहे. चिलीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस तिथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संपूर्ण दक्षिण अमेरिका महाद्वीपावर (लॅटिन अमेरिका) सर्वाधिक रुग्णसंख्या ही चिलीत आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, चिलीत आतापर्यंत 5,81,135 बाधित झाले असून 16,051 जणांचा मृत्यू झाला आहे. 

यापूर्वीही वादात अडकले होते चिलीचे राष्ट्राध्यक्ष

चिलीचे राष्ट्राध्यक्षांना यापूर्वीही आपल्या फोटोमुळे नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. मागील वर्षी त्यांनी राजधानी सँटियागोमध्ये असमानतेवरुन आंदोलन करत असलेल्या आंदोलकांबरोबर पिझ्झा पार्टी केली होती. त्यांचा पार्टीतील फोटो व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्याचबरोबर यावर्षी एप्रिलमध्ये सरकार विरोधात आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन फोटो काढल्यामुळे नाराजीचा सामना करावा लागला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाने मैदान गाजवले, महाराष्ट्राच्या पाच फलंदाजांना धडाधड तंबूत पाठवले, पहिल्या चेंडूवर विकेट अन्...

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT