china fighter aircraft , taiwan , us transport plane  
ग्लोबल

...अन् चीनच्या लढाऊ विमानांवर आली पळ काढण्याची वेळ

सकाळ डिजिटल टीम

तैपी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र निर्माण झाले असताना अमेरिका चीन शेजारील इतर राष्ट्रासोबतचे आपले संबंध दृढ असल्याचे दाखवून देत चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अमेरिकेचा हा डाव उधळून लावण्यासाठी मग चीनकडूनही हालचाली होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या वर्चस्वाच्या राजकारणात आणखी एक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. तैवानमध्ये अमेरिकेच्या विमानाने उड्डाण भरल्यानंतर काही तासांतच चीनने याठिकाणी फायटर जेट (लढाऊ विमान) धाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेकडे आंतरराष्ट्रीय राजकारणातील कटूनिती म्हणून पाहिले जात आहे. तैवानच्या हवाई दलाकडून पीपील्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ला इशारा देण्यात आला. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलाय.  

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशिया निर्मिती सुखोई-30 लढाऊ विमानांना आमच्या परिसरातून जाण्याचा इशारा दिला गेला. त्यानंतर तैवान हवाई दलाने घुसखोरी करणाऱ्या चिनी विमानांना आपल्या हद्दितून बाहेर जाण्यास भाग पाडले. काही सुखोई-30 लढाऊ विमानांनी आमच्या हद्दीत प्रवेश केल्याचे सैन्याच्या लक्षात आले. ही गोष्ट लक्षात येताच आमच्या हवाई दलाने तात्काळ पावले उचलत त्यांना रोखत रेडिओद्वारे चेतावणी देत त्यांना माघारी धाडले.  

आमचे सैनिक तैवान समुद्र आणि हवाई हद्दीवर बारिक लक्ष ठेवून असतात. हे क्षेत्र पूर्णपणे आमच्या नियंत्रणात आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायम ठेवण्यास सरकार सक्षम आहे, असेही तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी एक अमेरिकन लष्कराचे व्यापारी विमान सी-40 तैवानच्या पश्चिम किनाऱ्यावरुन उड्डाण करताना निदर्शनास आले. या विमानाने जपानमधील ओकीनामा हवाई अड्ड्यावरुन उड्डाण केल्यानंतर हे विमान तैवानच्या हद्दितून पुढे गेले. तैवानच्या भूमिकेनंतर या घटनेवर चीनने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र यापूर्वी अनेकवेळा चीनने तैवानमधील सरकार दोन्ही देशातील संबंध तोडण्याचे काम करत असल्याचे आरोप केले आहेत. 1949 मध्ये झालेल्या गृहयुद्धानंतर चीन आणि तैवान वेगवेगळे झाले आहेत. मात्र अजूनही चीन तैवानला हा आपला भूभाग असल्याचे मानतो. नुकतेच अमेरिका-तैवान यांच्यात नौसेनेसाठी उपयुक्त असलेल्या टॉरपॅडोचा व्यवहार झाला होता. या व्यवहारापासून चीन-तैवान आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण वातावरण आणखी वाढले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT