vietnam 
ग्लोबल

चीनने व्हिएतनामची पकड करण्याचा खेळला डाव

यूएनआय

वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रावरील मक्तेदारी कायम राखण्याच्या उद्देशाने चीनने व्हिएतनामची पकड करण्याचा डाव खेळला आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचे व्यवसाय बंद करण्यासह एक अब्ज डॉलर नुकसानभरपाई देणेही व्हिएतनामला भाग पडले आहे. डिप्लोमॅट या आंतरराष्ट्रीय घडामोडींची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या दबावामुळे तसेच वाढत्या कारवायांमुळे व्हिएतनामच्या कंपन्यांना या क्षेत्रात तेल आणि वायु स्रोत विकसित करता येत नव्हते. त्यातच पेट्रोव्हिएतनाम या सरकारी ऊर्जा कंपनीला उत्खनन मोहीम रद्द करावी लागली. तसा करार रद्द करण्याबरोबरच स्पेनचे रेप्सोल आणि संयुक्त अरब अमिरातीची मुबादला या दोन कंपन्यांना एक अब्ज डॉलरच्या घरात भरपाई देण्यास सहमती दर्शविणे भाग पडले. रेप्सोलकडे पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील 13 विभागांमधील उत्खननाचे हक्क होते, पण दोन वेळा त्यांना नियोजीत उत्खनन रद्द करावे लागले होते.

या संकेतस्थळाचे प्रतिनिधी बिल हेटन यांनी विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. आणखी एका घडामोडीनुसार वुंग ताऊ या आपल्या बंदरात दोन महिने उभा असलेला उत्खनन मनोरा तसेच इतर यांत्रिक सामग्री खाली उतरविणे व्हिएतनामला भाग पडले आहे. नोबल कॉर्पोरेशनकडे याची मालकी होती. त्यांना सुद्धा करार रद्द करण्यापोटी भरपाई द्यावी लागेल. परिणामी व्हिएतनामला आणखी लाखो डॉलरचा फटका बसेल.

अमेरिकेचा दबाव
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पीओ यांनी नुकताच चीनवर दबाव आणला होता. दक्षिण चिनी समुद्रात इतर देशांशी संबंधित कोणताही दावा अमेरिका फेटाळून लावते. या देशांच्या मासेमारी किंवा हायड्रोकार्बन निर्मिती उपक्रमांमध्ये अडथळे आणू नयेत. तशा कारवाया केल्यास त्या बेकायदेशीर असतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. व्हिएतनामलगतची वॅनगार्ड किनारपट्टी, मलेशियालगतचे ल्युकोनिया शोलाज, ब्रुनेईच्या सागरी हद्दीतील विशेष आर्थिक क्षेत्र आणि इंडोनेशियालगतचे नातुना बेसर असे विशिष्ट उल्लेख त्यांनी केले होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT