XI JINPING. 
ग्लोबल

G-7 परिषदेनं चीनचा तिळपापड; म्हणे,'ती वेळ निघून गेली'

सूरज यादव

‘कोरोनापासून मुक्ती आणि अर्थव्यवस्थेची मजबुती’ या संकल्पनेवर केंद्रीत यंदाच्या जी-७ देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक विश्व- एक आरोग्य’ असा मंत्र दिला.

लंडन - ‘कोरोनापासून मुक्ती आणि अर्थव्यवस्थेची मजबुती’ या संकल्पनेवर केंद्रीत यंदाच्या जी-७ देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक विश्व- एक आरोग्य’ असा मंत्र दिला. तसंच जो पर्यंत प्रत्येक जण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही, अशा शब्दांत कोरोनाशी सामूहिक लढ्याचे आवाहन केले. जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्रिटन, जपान, कॅनडा आणि अमेरिका या जी-७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची रविवारी सांगता झाली. दरम्यान, चीनने यावर कडवट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जी-७ देशांनी कोरोना आणि या विषाणूच्या उगमस्थानावरून केलेल्या मतप्रदर्शनामुळे तिळपापड झालेल्या चीनने, असे छोटे समूह जगाला नियंत्रित करू शकणार नाही, ती वेळ कधीच निघून गेली, अशी कडवट टिप्पणी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर चीनी आक्रमकतेचा भारताने या व्यासपीठावर मुद्दा उपस्थित केला काय, असे विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध या विभागाचे अतिरिक्त सचिव पी. हरीश यांनी सांगितले, की चीनी आक्रमकतेबद्दल पंतप्रधान बोलले नसले तरी असे मुद्दे उपस्थित करण्यासाठी अन्य व्यासपीठ आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये भारतासह दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या प्रमुखांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण होते. कोरोनोपूर्व स्थिती सक्षमतेने गाठण्यासाठी ‘बिल्ड बॅक बेटर’ या संकल्पनेवर जी-७ राष्ट्रप्रमुखांनी कोरोना विषाणूपासून मुक्ती, पर्यावरण सुधारणा, मुक्त व्यापार यावर व्यापक चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेत ‘वैश्विक आरोग्य, पर्यावरण आणि मुक्त समाज’ या विषयांवर मत मांडले. कोरोनापासून जगाला मुक्त करण्यासाठी जी-७ देशांनी ‘एक विश्व एक आरोग्य’ हा संदेश द्यावा, असे आवाहन केले. मोदींच्या या सूचनेचे सर्व सदस्य देशांनी स्वागत केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात जी-७ देशांनी भारताला केलेल्या मदतीसाठी मोदींनी आभार मानले. कोरोनाप्रतिबंधक लशींच्या सार्वत्रिक उपलब्धतेसाठी बौद्धिक संपदा कायद्यात सवलत मिळावी या भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेकडे मांडलेल्या प्रस्तावाला जी-७ देशांच्या पाठींब्याची मोदींनी साद घातली. तर, मुक्त समाज या विषयाशी संबंधित सत्रात बीजभाषण करताना मोदींनी दहशतवाद, माहितीचा विपर्यास यासारख्या प्रकारांचा मुक्त समाजाला असलेला धोका विशद करताना तंत्रज्ञान कंपन्या आणि सोशल मिडियाने वापरकर्त्यांसाठी सायबर सुरक्षित वातावरण द्यावे, असे आवाहनही मोदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT