Chinas military readiness near Ladakh is a wake-up call Chinas military readiness near Ladakh is a wake-up call
ग्लोबल

लडाखजवळ चीनची लष्करी तयारी ही धोक्याची घंटा; अमेरिकन लष्कराच्या इशारा

सकाळ डिजिटल टीम

लडाखमध्ये चीनने (China) अशी काही रचना तयार केली आहे जी धोक्याची घंटा (Warning) आहे. चीनचा हा प्रयत्न संबंध खराब करणारा आणि अस्थिर करणारा आहे, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ जनरलने दिला आहे. अमेरिकेचे जनरल चार्ल्स ए फ्लिन हे हिमालयीन प्रदेशात चीनच्या बांधकाम कामांबद्दल बोलत होते.

चिनीचा (China) हा प्रकार डोळे उघडणारा आहे. वेस्टर्न थिएटर कमांडमध्ये काही बांधकाम (military readiness) धोक्याचा इशारा देतात. कोणाला तरी प्रश्न विचारावा लागेल की चीन हे का करीत आहे, असे आशिया-पॅसिफिक प्रदेशावर देखरेख करणारे चार्ल्स ए फ्लिन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. चीनच्या हानिकारक आणि भ्रष्ट वर्तनाचा सामना करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारत (India) आणि अमेरिका (America) ऑक्टोबरमध्ये युद्ध अभ्यासावेळी उंचीवर लढाऊ प्रशिक्षण मिशन करणार आहेत. हा सराव हिमालयीन प्रदेशात ९,००० ते १०,००० फूट उंचीवर केला जाईल. त्याचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. अलास्कातील अत्यंत थंड वातावरणात भारतीय सैन्य असाच सराव करणार आहे. याचा उद्देश उंचीवरील युद्धात अतिशय उच्च-स्तरीय संयुक्त ऑपरेशनसाठी तयार करणे आहे.

ही एक अनमोल संधी

यामध्ये नवीन तंत्रज्ञान, हवाई दलाची संसाधने, लढाऊ विमाने, लॉजिस्टिक आणि रिअल टाइममध्ये माहितीची देवाणघेवाण यांचा समावेश असेल. भारतीय लष्कर आणि अमेरिकन लष्करासाठी ही एक अनमोल संधी आहे. ज्याचा ते लाभ घेऊ शकतात, असे फ्लिन यांनी सांगितले.

हिमालयीन प्रदेशात भारताला चीनकडून थेट आव्हान

जानेवारीमध्ये सॅटेलाइट फोटोंवरून वृत्त दिले होते की, पॅंगॉन्ग तलावाजवळ चिनी पूल बांधले जात आहेत. हे एक महत्त्वाचे बांधकाम आहे. ज्याचे भारतीय लष्करासाठी खूप महत्त्व आहे. या भागात भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात आहे. या भागात हवाई पट्टी, रस्ते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीलाही चीनने वेग दिला आहे. त्यामुळे हिमालयीन प्रदेशात भारताला चीनकडून (China) थेट आव्हान मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT