china1
china1 
ग्लोबल

चीन लडाखमध्ये वाढवतोय ताकद; सैनिकांना दिले 'आयर्नमॅन सूट'

सकाळन्यूजनेटवर्क

बिजिंग- लडाखमध्ये भारतासोबत भीडलेला चीन सातत्याने आपल्या सैनिकांची शक्ती वाढवतोय. पिपल्स लिबरेशन आर्मीला अत्याधुनिक शस्त्र दिले जात आहेत. नुकत्याच एका रिपोर्टनुसार, भारतीय सीमेवर तैनात असलेल्या पीएलएच्या सैनिकांना आयर्नमॅन एक्सोस्केलटन सूट देण्यात आले आहे. या सूटच्या मदतीने चिनी सैनिक उंचीच्या ठिकाणावर अधिक वजन घेऊन जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी चीनने भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात होवित्झर गन तैनात केले आहेत. 

सैनिकांना 'आयर्नमॅन सूट' देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच भागात चीनचा एक महत्वपूर्ण एअरफोर्स बेस आहे. भारताविरोधातील चीनच्या आक्रमणात हे केंद्र मोठी भूमिका बजावू शकते. या भागातील सैनिकांनी हे सूट घालणे सुरु केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या सूटमुळे मोठे वजन वाहून नेले जाऊ शकते. या सूटमुळे सैनिकांची कंबर किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यताही कमी होते. खराब हवामानात गस्त घालताना सैनिकांना या सूटमुळे जास्तीचे सामान जवळ ठेवणे शक्य होते. 

वजन सूटच्या फ्रेममध्ये ट्रान्सफर होते

चीनची सेंट्रल टेलीविजनच्या (CCTV) रिपोर्टनुसार, एका सप्लाय डिलिव्हरी मिशनदरम्यान शिनजियांग मिलिट्री कमांडच्या सैनिकांनी या सूटच्या मदतीने 20-20 किलोग्रॅम जेवण-पाणी आपल्यासोबत घेतले होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानामुळे उचललेले वजन सैनिकांच्या पायांवर नाही, तर आयर्नमॅन एक्सोस्केलटन सूटच्या फ्रेमवर पडते. वजन फ्रेममध्ये ट्रान्सफर होते. त्यामुळे अधिकचे वजन सोबत घेऊन चालण्यास सैनिकांना सोपे जाते. डोंगराळ भागात हे सूट प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात येते.  

उंचीवर ऑक्सीजनची कमतरता असते. त्यामुळे जवळ असलेल्या सामानाचे वजन तुलनेने खूप अधिक वाटू लागते. उंच ठिकाणी गेल्याने मानसाची सहनशक्तीही कमी होते. अशा परिस्थितीत आयर्नमॅन एक्सोस्केलटन सूट घातल्याने सैनिकांना जड वजन उचलण्यास मदत मिळते. तसेच उंच ठिकाणी जास्त काळ राहणेही यामुळे शक्य होते. हिमालय प्रदेशात थंडी खूप असल्याने अनेक सैनिक आजारी पडत असतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT