Electricity  sakal
ग्लोबल

300 अब्ज द्या, अन्यथा बत्ती गूल करू; चीनी कंपन्यांची पाकिस्तानला धमकी

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत 30 चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : चिनी कंपन्यांनी पाकिस्तान (Pakistan) सरकारला उघडपणे धमकी दिली आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानने जर त्यांचे 300 अब्ज रुपये दिले नाहीत तर, ते पाकिस्तानची बत्ती गूल करतील असा इशारा देण्यात आला आहे. चीनच्या या भूमिकेनंतर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला त्याचा जवळचा मित्र चीनकडून मोठा धक्का बसला आहे. (Pakistan News)

पाकिस्तानने चीनी कंपन्यांची जवळपास 300 अब्जांहून अधिकची रक्कम देणे बाकी आहे. दरम्यान, ही रक्कम न दिल्यास महिना अखेरपर्यंत नाईलाजास्तव पावर प्लांट (Power Plant) बंद करावे लागतील असे चीनी कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगाऊ पैसे न दिल्यास वीज प्रकल्प बंद करू, असे त्यांनी सांगितले.

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत 30 चीनी कंपन्या पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत आणि पाकिस्तानच्या ऊर्जा, दळणवळण, रेल्वे आणि इतर क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री अहसान इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यामध्ये सेवा देणाऱ्या चिनी कंपन्यांनी थकीत रकमेबाबत विचारणार करण्यात आली. त्यावेळी इक्बाल यांच्याकडे यावर काही बोलण्यासारखे नव्हते. या बैठकीत चीनी अधिकाऱ्यांनी इक्बाल यांच्याकडे क्लिष्ट व्हिसा प्रक्रिया, कर आदी विषयांबाबत अनेक तक्रारी मांडल्याने पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे. तसेच थकित रक्कम न भरल्यास आगामी काही दिवसात वीज प्रकल्प बंद करण्याचा इशारा चीनी कंपन्यांनी दिला आहे.

इक्बाल यांच्याकडून कंपन्यांना आश्वासन

दरम्यान, चीनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत मंत्री इक्बाल यांच्याकडून उद्भवलेल्या प्रश्नाची दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकार्‍यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास आणि त्वरित पैसे देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. चालू महिनाभरात त्यांची आर्थिक अडचण दूर केली जाईल, असे आश्वासन इक्बाल यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT