Chinese men interested in Ukraine girl for marriage 
ग्लोबल

लग्न करेन तर युक्रेनच्या मुलीशीच! चिनी पुरुषांचा निर्णय

चिनी मुलांना लग्नासाठी आपल्याच देशाातल्या मुली मिळणं कठीण झालं आहे

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनियन लोकांना पुढच्या आयुष्याची चिंता आहे. पण तिथल्या मुलींची काळजी सतावतेय ती चिनी मुलांना. सध्या चिनमध्ये 'मेल-ऑर्डर ब्राइड' हा बिझनेस लोकप्रिय होतो आहे. चिनी मुलांना लग्नासाठी आपल्याच देशाातल्या मुली मिळणं कठीण झालं आहे. एक मुल हवं या चिनच्या धोरणामुळे हे घडले आहे. त्यामुळे चिनमधल्या लिंग गुणोत्तरामुळे हे घडलं आहे. त्यामुळे आता चिनी पुरूष लग्न करण्यासाठी युक्रेनियन मुलींमध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत.

ही आहेत कारणे

एका ऑनलाइन वेबसाईटवर युक्रेनियन मुलींबरोबर लग्न करण्यासाठी चिनी पुरूष उत्सुक असल्याचे आढळून आले आहे. डेटिंग सर्व्हिस मिलिष्काने सांगितले की, युद्ध सुरू होण्यापूर्वी दररोज सुमारे ५ चिनी लोकांकडून चौकशी होत असे. ही संख्या आता दुप्पट झाली आहे. युक्रेनमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. डेटिंग सर्व्हीसचा रशियन मालक पावेल स्टेपनेट्सच्या मते चिनी पुरूषांना पूर्व युरोपमधील मुली अधिक आवडतात. कारण त्या चिनी मुलींप्रमाणे पैशांना जास्त महत्व देत नाहीत.

date

मीलिश्का डेटींग सर्व्हिस वेबसाईटच्या मते, सध्या ७४८ युक्रेनियन मुली लग्नासाठी चिनी मुलांचा विचार करत आहेत. स्टेपनेट्सने असा दावा केला आहे की, ७० चिनी मुलं लग्नासाठी मुली शोधत आहेत. ८ -९ जोडप्यांनी लग्नही केले आहे. स्टेपनेट्सने सांगितले की, युक्रेनी मुलींसाठी मागणी वाढली असून अनेक लोकं त्यांच्या स्थळाविषयी विचारतात. त्यांना युक्रेनी मुली दु:खी असतील याची जाणीव आहे. तसेच चीन त्यांना सर्वात सुरक्षित भाग वाटतो. खूप काळापासून युक्रेनी मुली चीनी पुरूषांबरोबर लग्न करत आहेत. पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनियन मुलींशी लग्न करण्याची मागणी आणखी वाढली आहे. चिनी पुरुषांना वाटते की युक्रेनियन मुली चिनी मुलांना जोडीदार म्हणून पाहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT