Chinese Ship vs India Report esakal
ग्लोबल

Chinese Ship : चिनी जहाज श्रीलंकेच्या हंबनटोट बंदरात, भारताचा तीव्र आक्षेप

श्रीलंकेनं वादग्रस्त चिनी जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिलीय.

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेनं वादग्रस्त चिनी जहाजाला आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिलीय.

Chinese Ship vs India Report : भारतानं व्यक्त केलेल्या चिंतेकडं दुर्लक्ष करत श्रीलंकेनं वादग्रस्त चिनी जहाजाला (Chinese Ship) आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिलीय. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. हे चिनी जहाज श्रीलंकेतील बंदरावर येताना हे जहाज (Ship) वाटेतील भारतीय संस्थांची हेरगिरी करेल, असा आक्षेप घेत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती.

चीनची बॅलेस्टिक मिसाईल आणि उपग्रह टेहेळणी जहाज युआन वांग 5 ला 11 ऑगस्ट रोजी हंबानटोटा बंदरात पोहोचायचे होते. तसेच 17 ऑगस्टपर्यंत तिथेच थांबणार होते. 12 जुलै रोजी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं चिनी जहाजाला हंबानटोटा बंदरामध्ये (Sri Lanka Hambantota Port) उभे करण्यास परवानगी दिली होती. मात्र, भारतानं घेतलेल्या आक्षेपानंतर 8 ऑगस्ट रोजी मंत्रालयानं कोलंबोस्थिती चिनी दूतावासाला पत्र लिहून जहाजाच्या प्रस्ताविक डॉकिंगला स्थगित करण्याची विनंती केली होती.

युआन वांग-5 हे जहाज 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत हंबनटोटा बंदरात नांगर टाकून डेरेदाखल असेल, असं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानंच स्पष्ट केलंय. 9 ऑगस्ट रोजी रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार चीनचं हेरगिरी करणारं जहाज हंबनटोटासाठी रवाना झालं होतं. या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळं उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे. त्यामुळं भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे.

चीनकडून हंबनटोटाचा वापर लष्करी कार्यवाहीसाठी होऊ शकतो, अशी भारताला साशंकता आहे. 1.5 अब्ज डॉलर खर्चून तयार झालेलं हंबनटोटा बंदर हे आशिया आणि युरोप समुद्री मार्गावरचं प्रमुख ठाणं आहे. हंबनटोटा बंदराच्या उभारणीसाठी घेतलेलं कर्ज चुकवता न आल्याने श्रीलंकेनं चीनकडे हे बंदर 99 वर्षांसाठी गहाण ठेवलं आहे. भारताला तेव्हापासून या बंदरासंदर्भात भीती वाटते आहे. आता तर श्रीलंकेनं या बंदरात चीनच्या हेरगिरी करणाऱ्या जहाजालाच थांबण्याची अनुमती दिल्यानं भारताच्या काळजीत भर पडलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT