afghanistan-university-taliban-rule 
ग्लोबल

तालिबानी राजवटीत कॉलेजमधील तरुण-तरुणींना एकमेकांकडं पाहण्यास बंदी!

महिलांवर दिवसेंदिवस होत आहेत निर्बंधांचे फतवे जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर आता महिलांवर निर्बंधांचे फतवे दिवसेंदिवस जाहीर होताना दिसत आहेत. कधी त्यांना खेळण्यापासून रोखण्यात येत आहे, तर कधी काम करणाऱ्या महिलांना घरातच राहण्याचा फतवा काढला जात आहे. आता तर महिलांना शिक्षण घेण्यापासून रोखण्यासाठीही कडक कायदे तयार केले जात आहेत. ताज्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणींनी एकमेकांकडे पाहू नये तसेच भेटू नये यासाठी वर्गामध्ये पडदे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तरुण-तरुणींसाठी भिन्न वेळांमध्ये गर्व भरवले जाणार आहेत.

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं राज्य आल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय बनलं आहे. तालिबान प्रशासनानं अद्याप शिक्षणाबाबत कोणतही स्पष्ट धोरण आखलेलं नाही. त्यामुळं काबूल विद्यापीठातील २६,००० आणि कंदाहर विद्यापीठातील १०,००० विद्यार्थ्यांचं भविष्य चिंताग्रस्त बनलं आहे. काबूल विद्यापीठात १२,००० तरुणी तर कंदाहर विद्यापीठात १,००० मुली शिक्षण घेत आहेत.

मुलींवर निर्बंधांबाबतचे विद्यापीठांनी तयार केले प्रस्ताव

अफगाणिस्तानात सध्या ४० सार्वजनिक विद्यापीठं आहेत. तालिबानमधील सहशिक्षणावर प्रतिबंधाचे आदेश आल्यानंतर उच्च शिक्षण मंत्रालयानं सरकारी विद्यापीठांना पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितलं आहे. आत्तापर्यंत बहुतेक विद्यापीठांनी प्रस्ताव ठेवलाय की, मुलींना पडद्यांआड किंवा क्युबिकलच्या मागून वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी किंवा त्या ज्या ठिकाणांहून शिकण्यासाठी इथं आल्या आहेत तिथे त्यांना पुन्हा पाठवून देण्यात यावं.

तखर विद्यापीठाचे कुलगुरु खैरुद्दीन खैरखा यांनी सांगितलं की, "मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे वर्ग भरवण्याचा आमची योजना आहे. हे त्या ठिकाणी लागू होईल जिथं एका वर्गात १५ हून अधिक मुली आहेत. यासाठी आम्ही शिफ्टमध्ये वर्ग भरवण्याचा विचार करत आहोत. जर १५ हून कमी मुली असतील तर आम्ही मध्ये डिव्हाडर बसवू ज्याचा रुग्णालयांमध्ये वापर केला जातो"

कंदाहर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सांगितलं की, "आमच्या काही विद्यार्थीनींनी आपल्या मूळ गावी जाण्यात रस दाखवला आहे. तर काही विद्यार्थींनी याच विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छित आहेत. त्यांच्यासाठी आम्ही वर्गामध्येच एक असा कोपरा तयार करणार आहोत जो एका पडद्याने वेगळा केलेला असेल"

विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षण

विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये सार्वजिनक विद्यापीठांमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत दिलं जात. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कुठलचं शुल्क आकारण्यात येत नाही. वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि राहण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT