Colombia plane crash amazon forest missing indigenous 4 children found alive
Colombia plane crash amazon forest missing indigenous 4 children found alive sakal
ग्लोबल

Colombia Plane Crash : विमान अपघातातील मुले जंगलात जिवंत सापडली

सकाळ वृत्तसेवा

बोगोटा : कोलंबियामधील ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात १७ दिवसांपूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेतील बेपत्ता चार मुलांचा शोध लागला असून ती जिवंत असल्याची माहिती कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी बुधावारी (ता.१७) दिली. ही घटना संपूर्ण देशासाठी आनंदाची असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांमध्ये अकरा महिन्याच्या एका बालकाचा समावेश आहे.

ॲमेझॉन येथील घनदाट जंगलामध्ये एक मे रोजी विमान कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये विमानचालकासह रोनोक मुकुटू या नावाची महिला आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रोनोकची चार मुले बेपत्ता झाली होती. या मुलांची वये १३ वर्षे, नऊ वर्षे चार वर्षे अशी आहेत त्यांच्यासमवेत एक अकरा महिन्यांचे बाळ देखील आहे. या मुलांची आई ॲमेझॉनमधील हुईटोटो या स्थानिक जमातीमधील होती.

विमान दुर्घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच या बालकांचा शोध घेण्यासाठी कोलंबियाच्या सैन्यदलाचे सुमारे शंभर सैनिक, श्‍वान पथका सह येथील जंगलामध्ये ‘ऑपरेशन होप’ सुरू केले होते. जंगलातील ४० मीटर उंचीची महाकाय झाडे, वन्य श्‍वापदांचा संचार आणि मुसळधार पाऊस यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. या भागात जाण्यासाठी फारसे रस्ते नसल्याने नदीतून जाणे अवघड आहे. त्यामुळे विमान वाहतूक हाच एक पर्याय वापरला जातो. शोधकार्यासाठीही तीन हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.

जंगलात आढळले खोपटे

या शोधमोहिमेत सैनिकांना विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांचे मृतदेह मिळाले. या परिसरात झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले खोपटे, तसेच दुधाची बाटली, अर्धवट खाल्लेले फळ, एक कात्री आणि हेअरबँड आदी वस्तू आढळल्याने अपघातातील काही जण जिवंत असल्याचा आशा निर्माण झाली होती. त्यानंतर शोधमोहिमेने अधिक वेग घेतला आणि तब्बल दोन आठवड्यांनी या घनदाट जंगलात चार मुले जिवंत सापडली.

ही चार मुले जंगलाच्या नेमक्या कोणत्या भागात सापडली याची माहिती पेट्रो यांनी दिली नाही. तसेच इतके दिवस ही चार मुले कोणत्याही मदतीशिवाय जंगलात कशी काय राहू शकली याचा उलगडाही झालेला नाही. विमान पडल्यानंतर ही मुले दक्षिण काक्वेटा भागातील जंगलात फिरत होती. दरम्यान, मुलांच्या आजीने हुईटोटो भाषेत पाठविलेला ध्वनिमुद्रित संदेश मिळाला. त्यात जंगलात न फिरण्याची सूचना तिने केली होती.

वैशिष्ट्यपूर्ण हुईटोटो

ॲमेझॉनच्या जंगलातील हुईटोटो (‘विटोटो’ असेही लिहिले जाते) ही दूर जंगलात एकोप्याने राहणारी जमात आहे. शिकार करणे, मासेमारीतील कौशल्य आणि चिकाटी ही या जमातीची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच ही लहान मुले जंगलात एकटी राहिली व जगू शकली. शोषण, रोगराई आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेमुळे अनेक दशकांपासून या समाजाची लोकसंख्या झपाट्याने कमी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT