ग्लोबल

Colombia Plane Crash: अ‍ॅमेझनॉच्या घनदाट जंगलात कोसळलेल्या विमानातील मुलं ४० दिवसांनी सापडली; वाचा थरारक अनुभव

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलंबिया : जगातील सर्वात जास्त पाऊस पाडणारं सर्वात मोठं आणि घनदाट असलेल्या अॅमेझॉनच्या जंगलात १ मे रोजी एक छोट विमान कोसळलं होतं. या विमानातून चार मुलं त्यांची आई आणि दोन पायलट प्रवास करत होते. हे विमान कोलंबियामधील अॅमेझॉनच्या जंगलात अपघातग्रस्त झालं होतं. (Colombia plane crash Children found after 40 days of plane crash in Amazon rainforest)

विमान अपघातात तिघांचा मृत्यू

या विमान अपघातात मुलांची आई आणि दोन पायलट्सचा मृत्यू झाला होता. पण अपघातानंतर ४० दिवसांनी ही मुलं जिवंत सापडल्यानं आश्चर्य तर व्यक्त केलं जात आहे. या मुलांमध्ये १३, ९, ४ आणि १ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या मुलांचा अखेर पत्ता लागल्यानं आणि ते जिवंत आढळल्यानं कोलंबियाचे अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला असून ही बाबत संपूर्ण देशासाठी आनंददायी घटना असल्याचं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

मॅजिकल डे

या बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य राबवण्यात आलं होतं. यामध्ये डझनभर सैनिक आणि स्थानिक लोकांचा समावेश होता. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या मुलांच्या शोधानंतर आजचा दिवस हा 'मॅजिकल डे' असल्याचं म्हटलं आहे. "ही मुलं एकटी होती पण त्यांनी जिवंत राहण्यासाठी केलेले प्रयत्न ही एक अचिव्हमेंट असून ही घटना म्हणजे इतिहास बनल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ही 'मुलं म्हणजे शांततेची मुलं आणि कोलंबियाची मुलं' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पेट्रो यांनी बचाव कार्याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये सैनिक आणि स्थानिक लोक दिसताहेत जे या मुलांची काळजी घेताना दिसत आहेत. एक बचावकर्ता एका मुलाला आपल्याकडील पाण्याच्या बाटलीतून एका चिमुकल्याला पाणी पाजताना दिसतो आहे. तर दुसरा एकजण दुसऱ्या एका मुलाला आपल्या हातातील भांड्यातून चमच्याच्या सहाय्यानं जेवण भरवताना दिसतो आहे.

दरम्यान, कोलंबियाच्या संरक्षण खात्यानं एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये या चिमुकल्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं उंचच उंच झाडांमधून एअरलिफ्ट करताना दिसत आहे. या मुलांना तातडीनं वैद्यकीय मदत देखील देण्यात आली. तसेच त्यांनी आपल्या आजोबांशी संवाद देखील साधला. "जंगल मातेनं त्यांना परत आणलं आहे" अशा शब्दांत त्यांच्या आजोबांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

नेमका अपघात कसा झाला होता?

सेस्ना 206 या छोट्या विमानातून चार मुलं आणि त्यांची आई प्रवास करत होते. अॅमेझोनास प्रांतातील अराराकुआरा येथून सॅन जोसे डेल ग्वाविअरेकडं या विमानानं उड्डाण केलं होतं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं याबाबत अॅलर्ट जाहीर करण्यात आला होता. पण विमान काही काळातच अॅमेझॉनच्या जंगलात कोसळलं होतं. या अपघातानंतर तीन प्रौढांचे मृतदेह लष्कराला अपघातस्थळी सापडले होते, पण ही मुलं दिसून आली नव्हती. पण ती बचावल्यानं मदत शोधण्यासाठी या पावसाच्या जंगलात भरकटली होती.

मुलांना शोधण्यात कशी झाली मदत?

बचावकर्त्यांना सुरुवातीला खूपच भीती वाटतं होती की ही मुलं जिवंत पण असतील की नाही. कारण ज्या घनदाट जंगलात विमान क्रॅश झालं ते जंगल जग्वार, साप आणि इतर अनेक हिस्त्र प्राण्यांचा अधिवास आहे. परंतू मुलांच्या पायाचे ठसे आणि अर्धवट खाल्लेली जंगली फळ हाच मुलं जिवंत असल्याचा त्यांच्यासाठी पुरावा होता. तसेच जंगलात राहण्यासाठी तात्पुरते निवाऱ्याचे अवशेष, कात्रीची जोडी आणि केसांचा बांध या गोष्टी देखील बचाव पथकाला सर्वात आधी आढळून आल्या.

तसेच 23 मे रोजी जंगलात मोबाईल फोनचा एक धातूचा तुकडा सापडला. नंतर, मोबाईल फोनचा भाग वाटणारा धातूचा तुकडा जंगलात दुसर्‍या ठिकाणी सापडला. जी जंगली फळ अर्धवट खाल्याचं दिसून आलं यावरुन मुलं अजूनही जिवंत असतील आणि स्वतःचा बचावासाठी धडपडत असतील असा निष्कर्ष बचाव पथकानी काढला.

हुइटोटो या स्थानिक बचाव पथकाच्या सदस्यांना आशा होती की, या भावंडांना जंगली फळांचं ज्ञान मिळाल्यामुळं या जंगलाच्या वातावरणात टिकून राहता आलं असेल. घटनास्थळावरील जे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक जवान आणि स्थानिक बचाव पथकातील सदस्य या मुलांसोबत दिसत आहेत. ही मुलं सापडल्यानंतर त्यांना जेवण, पाणी आणि प्रथोमोपचार पुरवण्यात आला. यानंतर त्यांना कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे नेण्यात आले जिथं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT