Baba Nityanand sakal
ग्लोबल

Baba Nityanand : नित्यानंदला वाचवण्यासाठी धावून आली लाडकी शिष्या! UN मध्ये भारतावर केले गंभीर आरोप

आज आपण नित्यानंदची लाडकी शिष्या विजयप्रियाविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Baba Nityanand : स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे. त्यामुळे स्वामी नित्यानंद चांगलाच चर्चेत आहे. एवढंच काय तर या नित्यानंद बाबने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्याच्या देशातून शिष्टमंडळ सुद्धा पाठवल्याचा दावा केला आहे.

जिनेवा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात त्याच्या कथित देशाची राजदूत म्हणून विजयप्रियाने सहभाग नोंदवताना दिसत आहे. आज आपण नित्यानंदची लाडकी शिष्या विजयप्रियाविषयी जाणून घेणार आहोत. (controversial swami Baba Nityanand female disciple kailasa ambassador defends him in un know about his spouse)

22 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्राने स्वित्जरलँडच्या जिनेवा शहरात १९ वे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांवर एक सम्मेलनचे आयोजन केले होते. यामध्ये काल्पनिक देश कैलासाच्या वतीने विजयप्रिया आणि तिच्या शिवाय आणखी पाच महिला होत्या.

कैलासा लॉस एंजिल्सची प्रमुख मुक्तिका आनंद, कैलासा सँट लुइसची चीफ सोना कामत, कैलासा यूकेची चीफ नित्या आत्मदायकी, कैलासा फ्रांसची चीफ नित्या वेंकटेशनंदा आणि कैलासा स्लोवेनी मां प्रियमपरा नित्यानंदा सहभागी झाल्या होत्या.

विजयप्रियाने भारतावर केले गंभीर आरोप

मीडिया रिपोर्टनुसार या सम्मेलनात विजयप्रियाने भारताविरोधात टिका केली. विजयप्रियाने दावा केला की भारताने त्यांचे सर्वोच्च गुरु नित्यानंद याला त्रास देत आहे. विजयप्रियाने संयुक्त राष्ट्राला प्रश्न केला की कैलासामध्ये नित्यानंद आणि 20 लाख हिंदू प्रवाशांनी वाढती लोकसंख्येला थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते उपाय करावे?

भारतात नित्यानंदवर रेपसह अनेक प्रकरणावरुन गंभीर आरोप आहे आणि यामुळेच तो भारतातून फरार झाला होता.

कोण आहे स्वामी नित्यानंद ?

स्वामी नित्यानंद यांचं खर नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. मात्र या पदव्या खोट्या असल्याचं बोललं जातं. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पुर्ण केले, असंही म्हणतात.

२०१० मध्ये स्वामी नित्यानंद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्रीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा त्याने केला होता. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.

नित्यानंदने आता स्वत:चा वेगळा देश बनवला

स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे. याशिवाय नित्यानंद यांने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्याच्या देशातून शिष्टमंडळ पाठवले आहे. यासंबंधी नित्यानंद सोशल मीडियावरुन प्रचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT