नवाझ शरीफ यांचे ट्‌वीटरवर प्रसिद्ध झालेले छायाचित्र. 
ग्लोबल

नवाझ शरीफ यांच्या या फोटोमुळे वादाची ठिणगी

वृत्तसंस्था

लाहोर - माजी पंतप्रधान नवाझ शरीफ लंडनमधील रस्त्यालगतच्या कॅफेमध्ये आपल्या नातींबरोबर चहा पीत असल्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलचा वाद आणखी चिघळला. शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील सुनावणीसाठी मायदेशी परत आणावे अशी मागणी सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या मंत्री आणि सदस्यांनी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हे छायाचित्र अगदी अलिकडचे असावे. शरीफ यांनी निळ्या रंगाची सलवार कमीज घातली असून डोक्‍यावर टोपी आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे त्यावरून वाटते. शरीफ ७० वर्षांचे असून तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी गेल्या वर्षी त्यांनी लाहोर उच्च न्यायालयाकडून परदेशी जाण्याची परवानगी मिळविली होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना चार आठवड्यांसाठी परदेशी जाण्याची मुभा मिळाली. त्या मुदतीत किंवा प्रवास करण्याइतपत प्रकृती चांगली झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगताच आपण मायदेशी परत येऊन आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊ असे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले होते. त्यांना ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांचा गुंतागुंतीचा आजार झाल्याचे निदान सत्ताधारी पक्षाच्या डॉक्‍टरांच्या पॅनेलने केले होते.

त्यानंतरच त्यांना परदेशी उपचारासाठी पाठवावे असा सल्लाही या पॅनेललने दिला होता. लंडनमधील रुग्णालयात त्यांच्या आजाराचे सखोल निदान झाले. शस्त्रक्रिया मात्र कोरोनामुळे लांबणीवर पडल्याची माहिती त्यांच्या मुलीने अलिकडेच दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT