drinking water 
ग्लोबल

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणं पडलं महागात; आयसीयूत व्हावं लागलं दाखल

सकाळ डिजिटल टीम

लंडन - कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यापासून लोकांनी खबरदारी घ्यायला सुरु केली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे महत्त्वाचं आहे. याशिवाय इतरही अनेक उपाय लोकांनी केले. तसंच इतरही काही घरगुती उपाय लोक करत होते. यामध्ये गरम पाणी पिणे, त्यातही पाणी पिण्याचं प्रमाण जास्त असायला हवं असे अनेक उपाय केले जात होते. अशाच एका उपायाचा वापर करणं रुग्णाला महागात पडलं आहे. ल्यूक विल्यम्सन यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे स्वत:च्या जीवावर वेगळंच संकट ओढवून घेतलं आहे. 

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ल्यूक विल्यम्सन यांना आपल्याला कोरोना झाला आहे अशी भीती वाटली. त्यानंतर कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी दररोज पाणी पिण्याचं प्रमाण दुप्पट केलं. सामान्यपणे एक ते दोन लीटर पाणी माणसाला पुरेसं असतं. मात्र ल्यूक दररोज चार ते पाच लीटर पाणी प्यायला लागले. त्यांनी असं अनेक दिवसं केलं आणि यामुळे प्रकृतीवर विपरित परिणाम झाला. 34 वय असलेले ल्यूक अचानक बेशुद्ध पडले.

ल्यूक यांच्या पत्नीने सांगितलं की, सायंकाळी ते अंघोळ करण्यासाठी गेले आणि बाथरूममध्येच पडले. लॉकडाऊन असल्यानं कोणत्याच शेजाऱ्यांकडून मदत मिळू शकली नाही. अॅम्ब्युलन्स बोलावली तर ती 45 मिनिटांत आली. तोपर्यंत जवळपास 20 मिनिटे ल्यूक बेशुद्धावस्थेत होते. यामुळे मला खूप भीती वाटत होती असं ल्यूक यांच्या पत्नीने सांगितले. 

अचानक पडल्यानं ल्यूक हे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर ल्यूक यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा ल्यूक यांच्या शरिरात पाणी जास्त प्यायल्याने मीठाचं प्रमाण कमी झाल्याचं आढळलं. डॉक्टरांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून ते जास्त पाणी पित होते. त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी झालं आणि तब्येत इतकी बिघडली. त्यांना आयसीयुमध्येही ठेवण्यात आलं होतं. परिस्थिती इतकी बिघडली होती की ल्यूक यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT