coronavirus china second wave might happen soon 
ग्लोबल

बाप रे : चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट 

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग Coronavirus : चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे संकट कायम असून देशामध्ये संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. जगभरातील देश हे कोरोनाची लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करत असून लोकांत पुरेशी रोग प्रतिकार क्षमता नसणे ही चिंतेची बाब असल्याचे चिनी तज्ञांचे म्हणणे आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

चीन सरकारचे जेष्ठ वैद्यकीय सल्लगार डॉ. झोन्ग नानशान म्हणाले की, "मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाब समोर आली होती, पण सरकारने ती दडवून ठेवली, यानंतर पुढे किती मोठा उद्रेक झाला हे जगाला दिसतेच आहे." 

म्हणून लोकडाउन 
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ८२ हजार लोकांना या विषाणूंचा संसर्ग झाला असून ४ हजार ६३३ मृत्यू झाले आहेत. जानेवारी महिन्यात संसर्ग अधिक वेगाने वाढल्यानंतर लॉकडाउन लागू करण्याची वेळ सरकारवर आली. 

धोका कायम 
चीनमधील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असून काही भागातील लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर शाळा आणि कारखाने पूर्ववत सुरू झाले आहेत. उद्योगचक्र गतिमान झाले असले तरीसुद्धा संसर्गाचा धोका कायम आहे. 

युरोपीय देशांसारखी स्थिती 
चीनमध्ये आज देखील बहुतांश लोकांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी आहे. त्यामुळे ते पुन्हा संसर्गाला बळी पडू शकतात. आमची स्थिती काहीशी परकी युरोपियन देशांप्रमाणेच असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सार्स हिरो 
चीनमध्ये २००३ साली सार्स विषाणूच्या संसर्गाने डोके वर काढल्यानंतर त्याचा यशस्वीरित्या मुकाबला करण्याचे काम झोन्ग यांनी केले होते. तेव्हापासून त्यांची ओळख ही चीनमधील सार्स हिरो अशी झाली होती. आता कोरोनाच्या संकटाने चीनला जबरदस्त तडाखा दिल्यानंतर त्यांनीच पुढाकार घेत सरकारला मदत करायला सुरवात केली आहे. 

स्थानिक अधिकारी पहिल्या टप्प्यात गप्प राहिल्याने सत्य लोकांना समजू शकले नाही. परिणाम पुढे या संसर्गाचा उद्रेक झाला. 
- झोन्ग नानशान, चिनी वैद्यकीय संशोधक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT