hydroxychloroquine, Coronavirus, Donald Trump 
ग्लोबल

डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन ट्रम्प स्वत:च्या मनानं खाताहेत भारतातून मागवलेलं औषध

वृत्तसंस्था

वाशिंग्टन :  कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णावरील उपचारादरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या उपयुक्त ठरत आहेत. जगभरातील अनेक देश भारताकडून या गोळ्यांची मागणी करत आहेत. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताकडून जवळपास 70 टक्के हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची निर्यात होत आहे. कोरोना विषाणूच्या सर्वाधिक प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा पुरवठा करुन भारताने मदतीचा हात द्यावा, अशी विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. या गाष्टीची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता ट्रम्प यांनी या औषधासंदर्भात केलेल्या आणखी एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचे सेवन करत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मागील काही दिवसांपासून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच जाहीर केले. अमेरिकेतील वैद्यकीय तज्ञ तसेच डॉक्टर यांच्याकडून करोना बाधित रुग्णांनी सल्ल्यानुसारच हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांचे सेवन करावे असे सांगितले होते. कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतानाही डोनाल्ड ट्रम्प  मागील आठवड्यांपासून खबरदारी म्हणूनया गोळ्या घेत आहेत.  

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे मुळात मलेरियावरील औषध आहे. मात्र हे औषध कोरोना विषाणूवर रामबाण उपाय असल्याचे  ऐकले असल्याने मी मागील काही दिवसांपासून याचे सेवन करत असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिली.  दुसरीकडे वैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते,  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोना विषाणूवर पूर्णपणे उपयुक्त नसल्याचाही दावा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वांनीच कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेण्याचा अनाहूत सल्ला ट्रम्प यांनी दिल्याचे पाहायला मिळाले होते.  महत्वाचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला असून, कोरोनाची कोणतीही लक्षणं त्यांच्यामध्ये आढलेली नाहीत. तरीदेखील आपण दररोज हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची एक गोळी घेत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

यापूर्वी ट्रम्प यांनी  हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या पुरवठ्यावरून भारताला धमकी वजा इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीची चर्चा रंगत असताना भारतानेही या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध शिथील करत अमेरिकेसह ठराविक राष्ट्रांना हे औषध निर्यात करण्यासंदर्भातील निर्णय घेतला. या निर्णयानंतर भारतासोबतच्या मैत्रीचा दाखला देत ट्रम्प यांनी इशाराच्या भाषेवर सारवासारव केल्याचेही पाहायला मिळाले होते.  हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे काही साईडइफेक्ट असून त्यावर अजून संशोधन सुरु असल्याचे काही तज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT