astrazenca vaccine europe 
ग्लोबल

एस्ट्राझेनकाच्या लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल EMA कडून खबरदारीचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

बर्लिन - युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या सुरक्षा समितीने एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबत आता नवीन इशारा दिला आहे. एजन्सीने एका रिपोर्टमध्ये म्हटलं की, एस्ट्राझेनकाची लस घेणाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी लस घेतल्यानंतर कमी प्लेटलेट्सच्या रक्ताच्या गुठळ्यां प्रकरणांकडे गांभीर्याने पाहायला हवं. रक्ताच्या गुठळ्या होणं हा दुष्परिणाम असू शकतो. एस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर कोणती धोकादायक लक्षणं दिसलेली नाहीत. खरं तर वयोवृद्ध आणि इतर शारीरिक त्रास असलेल्या रुग्णांवर केलेल्या संशोधनात हे सर्व आढळून आलं आहे. लशीच्या अशा प्रकारच्या दुष्परिणामांची शक्यता खूप कमी आहे. 

ईएमएने म्हटलं की, लोकांना याच्या लक्षणांबद्दल माहिती असायला हवं. त्यांना वेळेत दुष्परिणाम ओळखता येईल आणि तातडीने वैद्यकीय उपचार घेता येतील. युरोपिय मेडिसिन एजन्सने थ्रोम्बोसायटोपेनिया हे सामान्य असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच 100 पैकी एखाद्या व्यक्तीमध्ये असे दुष्परिणाम होऊ शकतात. तर दहा पैकी एकामध्ये अशी लक्षणे आढळू शकतात. रक्ताच्या गुठळ्यांसह प्लेटलेट कमी होणं ही लक्षणं आढळण्याची शक्यता असते. रक्ताच्या गुठळ्यांसह थ्रोम्बोसायटोपेनियाचे प्रकार खूपच दुर्मीळ आहेत. लस घेतलेल्या 10 हजार जणांपैकी फक्त एकाला असं होऊ शकतं. 

एस्ट्राझेनकाने लशीचे पॅकेज लीफलेटसुद्धा अपडेट केलं आहे. यामध्ये डोकं, आतडे, यकृतात रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या होणं याबद्दल खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. दुर्मीळ अशा प्रकारामध्ये रक्ताच्या गाठी मेंदूच्या नसांमध्ये होतात. इथूनच आतडे आणि धमण्यांमध्ये रक्त पोहोचतं. 

आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये असा प्रकार आढळला आहे. यात सर्वाधिक प्रकरणं ही लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यातील आहेत. दुसऱ्या डोसनंतर असं खूप कमी आढळल्याचं ईएमएने म्हटलं आहे. लशीमुळे कोरोनाला रोखणं आणि मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे. तसंच कोरोना व्हायसला रोखण्यासाठी लस देणं सुरु ठेवायला हवं. तरच कोरोनाला आटोक्यात आणणं शक्य होईल असंही ईएमएनं म्हटलंय. 

युरोपियन मेडिसिन एजन्सीचे प्रमुख एमर कुक यांनी सांगितलं की, सुरक्षा समितीने एस्ट्राझेनकाच्या लशीच्या सकारात्मक प्रभावावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोरोनाच्या लढाईत ही लस प्रभावी आहे आणि याचे साइड इफेक्ट हे खूपच कमी आहेत. लस लोकांचे जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT