COVID 19 pandemic, America, India 
ग्लोबल

COVID-19 सर्वाधिक प्रभावित राष्ट्रांच्या यादीत भारत दहामध्ये, पाहा कोणता देश कोणत्या क्रमांकावर?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: Coronavirus Cases in India: जगभरासह भारतामध्ये कोरोना विषाणू लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत भारतामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले असून सर्वाधिक प्रभावी राष्ट्रांच्या यादीत पहिल्या दहामध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1.39 लाखवर पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 1,38,845 रुग्ण आहेत. यातील 4,021 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

मागील 24 तासांत देशात  6,977 नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. ही आकडेवारी भीती निर्माण करणारी असली तरी 57721 रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची रिकवरी 41.57 टक्के आहे. यात झालेली वृद्धी ही जमेची बाजू आहे. देशातील महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूने अधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने 50,000 चा टप्पा पार केलाय. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या राज्याच्या यादीत तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. या यादीत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.  

देश एकूण रुग्ण सध्याचे रुग्ण  बरे झालेले रुग्ण  मृतांची संख्या
अमेरिका 16,43,246      11, 78,790 3,66,736 97,720
ब्राझील 3,63,211 1,90,634 1,49,911     22,666
रशिया 3,44,481 2,27,641     1,13,299     3,541
यूके 2,60,916 2,22,890 1,151 36,875
स्पेन 2,35,772 56,644     1,50,376 28,752
इटली 2,29,858 56,594 1,40,479 32,785
फ्रान्स 1,82,709 89,604 64,735 28,370
जर्मनी 1,80,328     11,764 1,60,281 8,283
तुर्की     1,56,827 33,793 1,18,694     4,340
भारत 1,38,845 77,103 57,721 4,021

चीनच्या वुहान शहरातून जगभरात वेगाने संक्रमण होणाऱ्या कोरोना विषाणूने युरोपातील इटलीनंतर अमेरिकेत थैमान घातल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले असून याठिकाणी मृतांचा आकडाही कमालीचा आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वेगावे वाढताना दिसत आहे. ब्राझीलला सध्या कोरोनाचे नवे केंद्र बनण्याची भीती सतावत आहे. कोरोनाजन्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाउनचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. युरोपातील इटलीत परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. इटली मोठ्या प्रादुर्भावाच्या फटक्यानंतर सावरतानाचे चित्र आहे. या ठिकाणी हळूहळू लॉकडाउन हटवले जात असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतामध्ये प्रभावित भागातून स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे शहरातील प्रादुर्भाव ग्रामीण भागात शिरकाव करत असल्याचे चित्र आहे. हे सरकार आणि प्रशासनासमोर नवे आव्हान असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT