pakistan minister zartaj gul wazir 
ग्लोबल

पाकच्या मंत्र्याने 'कोविड 19'चा लावला जावई शोध...

वृत्तसंस्था

कराची: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानलाही त्याचा फटका बसला असून, कोविड १९ या शब्दाबाबत पाकिस्तानच्या पर्यावरण मंत्री जरताज गुल वजीर यांनी जावई शोध लावला असून, सोशल मीडियावर त्या ट्रोल झाल्या आहेत.

मंत्री जरताज गुल वजीर या नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी जरताज गुल यांनी कोविड १९ बाबत वक्तव्य करून खिल्ली उडवली घेतली. त्यांना एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान पत्रकाराने कोविड १९ बाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना जरताज गुल म्हणाल्या, 'कोविड १९ चा अर्थ असा आहे की यात १९ पॉईंट्स असतात, जे कोणत्याही देशाला कशाही प्रकारे लागू होऊ शकतात.' संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. एका मंत्र्याला कोविड १९ या शब्दाचा अर्थ माहित नसून, त्याचा त्यांनी नवीन जावई शोध लावल्याची टीका होत आहे.'

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात कोविड १९ मध्ये १९ याचा अर्थ काय आहे, याचा जमीन हादरवणारा शोध अशा शब्दात ट्विट करुन टोमणा मारला आहे. त्यावर अनेकांनी हे ट्विट लाईक्स आणि शेअर केले आहे. दरम्यान, कोविड -१९ म्हणजे  कोरोनाव्हायरस रोग २०१९ कोविड -१९ मधील CO या शब्दाचा अर्थ कोरोना, VI विषाणूसाठी आणि रोगासाठी D आहे. यापूर्वी हा आजार २०१९ नोवल कोरोनाव्हायरस किंवा २०१९-एनसीओव्ही म्हणून ओळखला जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Statement : नीट पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच बोलले, म्हणाले- हे घोर पाप, सरकारने दोषींवर कडक कारवाई केली

Dharmendra Pradhan Resignation : अमित शाह, धर्मेंद्र प्रधान यांच्यात तब्बल ३ तास चर्चा; प्रधान यांचा राजीनामा होणार?, गुप्तचर विभागाचा अहवालात काय?

Live Updates Marathi : दीड वर्षांचा असताना वडिलांची हत्या, तब्बल २३ वर्षांनी मुलाने घेतला थरारक बदला

Mumbai Rain: पावसाची दुसरी इनिंग सुरू! मुंबईतील जलसाठ्यात दिवसेंदिवस वाढ, ७ धरणांची आकडेवारी समोर

खूप चांगला लाठीचार्ज केलात, धन्यवाद; अभिजीत दीपकेसह आंदोलकांनी पोलिसांचं टाळ्या वाजवून केलं स्वागत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT