coronavirus smart helmet find feaver patient in rome 
ग्लोबल

हेल्मेट ओळखणार कोरोनाची लक्षणं...

वृत्तसंस्था

रोम (इटली): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्यावर निर्बंध घालण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण, समोरच्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं आहेत की नाही, हे आपल्याला समजत नाही. पण, डोक्यावर असलेले हेल्मेटमुळे कोरोनाची लक्षण समजण्यास मदत होणार आहे.

चीनमधून व्हायरल झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अमेरिका, स्पेन आणि इटलीला याचा मोठा फटका बसला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विविध देशांमध्ये कोरोनावर संशोधन सुरू आहे. इटलीने एक विशेष हेल्मेट तयार केले आहे. यामुळे समोरील व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचे विषाणू आहेत की नाही हे आता तत्काळ समजणार आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आली आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या शरीरातील तापमान किती आहे हे सहज स्कॅन करता येते.

रोम विमानतळावर प्रवाशांचे स्कॅनिंग हा स्मार्ट हेल्मेट करणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे खास हेल्मेट तयार करण्यात आले आहे. या आधुनिक हेल्मेटद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्‍यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर शरीरातील तापमानात होणारे बदल सांगणार आहे.

सुरक्षा अधिकारी स्मार्ट हेल्मेट घालून विमानतळावर नागरिकांचे स्कॅन करण्यासाठी उभे राहातील. हेल्मेटसमोर येऊन प्रत्येक प्रवाशाने आपला चेहरा दाखवल्यानंतर हेल्मेटमधून शरीरातील तापमान स्कॅन केले जाईल. या हेल्मेटचा वापर करणारे रोम हे युरोपातील पहिले शहर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून, लुटणाऱ्या सहा चोरट्याना अटक

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT