coronavirus world health organization praises China USA 
ग्लोबल

जागतिक आरोग्य संघटनेनं अमेरिकेशी 'पंगा'; चीनचं तोंडभरून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग Corronavirus : कोरोना व्हायरसमुळं सध्या चीन विरुद्ध जवळपास संपूर्ण जग, अशी परिस्थिती आहे. चीनला जागतिक आरोग्य संघटना पाठिशी घातल असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता. अमेरिकेने सातत्याने चीनवर आरोप केले आहेत. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेलाही जबाबदार धरले आहे, अशा वातावरणात जागतिक आरोग्य संघटनेने चीनचं भरभरून कौतुक करत अमेरिकेची पुन्हा नाराजी ओढवली आहे. 

कोरोनाच्या जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनला झुकते माप देत असल्याबद्दल अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) दोषी धरत असली तरी आज या संघटनेने आज कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविल्यावरून चीनचे कौतुक केले आहे. जणू, अमेरिकेच्या टीकेची आपल्याला फिकीरच नाही, अकोरोनाचा उद्रेक झाला असतानाही परिस्थिती नियंत्रणात आणून जनजीवन पूर्वपदावर कसे आणायचे, हे चीनकडून जगाने शिकले पाहिजे, असे ‘डब्लूएचओ’ने म्हटले आहे. चीनला करत असलेल्या मदतीवरून अमेरिका गेल्या काही दिवसांपासून जागतिक आरोग्य संघटनेवर आगपाखड करत असून त्यांना दिला जाणारा निधीही रोखण्यात आला आहे. संक्रमणाची सुरुवात झालेल्या वुहान शहरात आता गेल्या महिनाभरापासून एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याची नोंद आरोग्य संघटनेने घेतली आहे. ‘ही अत्यंत चांगली बातमी असून याबद्दल चीनचे अभिनंदन केले पाहिजे. चीनने निर्बंधांची कशी अंमलबजावणी केली, ते कसे मागे घेतले आणि जनजीवन पूर्वपदावर कसे आणले, या गोष्टी जगाने चीनकडून शिकून घ्याव्यात. जनजीवन पूर्वपदावर येण्याची व्याख्या आता बदलावी लागण्याची शक्यता असून विषाणूचा धोका भविष्यातही राहू शकतो,’ असे ‘डब्यलूएचओ’च्या अधिकारी मारिया व्हान केर्खाव्ह यांनी सांगितले.

जागतिक साथीची घोषणा योग्यवेळीच 
कोरोनाच्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने योग्य वेळीच जगाला माहिती दिली असती तर त्याची तयारी करण्यास सर्वांना वेळ मिळाला असता, या अमेरिकेच्या आरोपाला आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसूस यांनी आज उत्तर दिले. ‘आम्ही योग्य वेळीच, म्हणजे जानेवारीमध्येच याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर सर्व देशांना आवश्‍यक हालचाली करण्यास वेळ होता,’असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अमेरिकेने या संघटनेवर जोरदार टीका केली असून त्यांची भूमिका तपासण्यासाठी आपल्या तपास संस्थांनाही कामाला लावले आहे. कोरोनाच्या प्रसारासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी चीनला दोषी ठरविले असून त्यांच्याकडून अब्जावधी डॉलरच्या नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT