Corona_Italy
Corona_Italy 
ग्लोबल

Corona Updates: इटलीत कोरोनाची दुसरी लाट; शाळा, दुकाने बंद राहणार

पीटीआय

रोम : कोरोनाची दुसरी लाट आल्याने इटलीत दुकान आणि शाळा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी जाहीर केला. देशात वेगाने कोरोना संसर्गाचा प्रसार होत असून त्याला रोखण्यासाठी इटली सरकारने नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ईस्टरच्या पार्श्वभूमीवर ३ ते ५ एप्रिल असे तीन दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन लागू केला जाणार आहे. 
इटलीने गेल्यावर्षी संपूर्ण देशात लॉकडाउन लागू केला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मंदावलेला कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

युरोपमध्ये ब्रिटनंनतर इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत लसीकरण मोहिम दिरंगाई झाल्याचेही सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात लशीची टंचाई दूर करण्यासाठी इटली सरकारने ऑस्ट्रेलियाला निर्यात केले जाणारे लशीचे डोस थांबवले. संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून पुन्हा कडक निर्बंध लागू केले जात असून येत्या सोमवारपासून शाळा, दुकान, रेस्टॉरंट हे निम्याहून अधिक बंद होतील, असे सांगण्यात आले. यात रोम आणि मिलान या दोन मोठ्या लोकंसख्येच्या शहरांचा समावेश आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून दररोज २५ हजाराने नव्याने भर पडत आहे. 

दुसऱ्या लाटेचे परिणाम

- इटलीतील निम्म्या भागातील शाळा, दुकाने आणि रेस्टॉरंट बंद राहणार
- अत्यावश्‍यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडण्यास बंदी
- इस्टर अखेरपर्यंत अतिरिक्त निर्बंध लागू राहणार
- सारदिनिया बेटावर संसर्गाचा दर अत्यंत कमी

युरोपातील चित्र

पोलंड : पोलंडमध्ये शनिवारी नव्याने २१०४९ रुग्णाची भर. हा आकडा नोव्हेंबरनंतरचा सर्वाधिक

जर्मनी : शाळकरी विद्यार्थ्यांत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याची नोंद

फ्रान्स : देशभरात आयसीयूमधील रुग्णांची संख्या ४ हजारावर. ही संख्या तीन महिन्यातील सर्वात जास्त. 

स्लोव्हेकिया-झेक : युरोपीय यूनियनची मान्यता नसलेली लस खरेदी केल्याने सरकार अडचणीत

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT