Bill_Gates 
ग्लोबल

देणाऱ्याचे हात हजारो; कोरोनाविरोधी लढाईसाठी गेट्स फाउंडेशनकडून 250 दशलक्ष डॉलर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील विविध देशांच्या लढाईला बळ देण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने अडीचशे दशलक्ष डॉलरची मदत देऊ केली आहे. यातील बहुतांश निधी हा सब सहारन आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमधील लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. विविध मार्गांनी या निधीचे वाटप केले जाणार आहे.

नव्या वर्षाच्या प्रारंभी कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या अनेक लशी आणि औषधे बाजारामध्ये उपलब्ध होतील, असा विश्‍वास बिल गेट्स यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये व्यक्त केला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संशोधने लोकांपर्यंत पोचल्यानंतरच त्यांचे प्राण वाचू शकतील. आफ्रिका आणि अन्य गरीब देशांमध्ये निधी पोचविणे हे सर्वांत मोठे आव्हानात्मक काम असल्याचे गेट्स यांच्याकडून सांगण्यात आले. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश असून सध्या या देशामध्ये संसर्गाची दुसरी लाट उसळी असल्याने त्याला तातडीच्या आर्थिक मदतीची आवश्‍यकता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

लसीकरणाचे ध्येय
पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत आफ्रिकेतील तीन टक्के लोकांना लसीकरण करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय असून वर्षाच्या अखेरपर्यंत हे प्रमाण वीस टक्क्यांवर नेण्याचा संघटनेचा विचार आहे. जगातील केवळ ४७ देशांकडे आरोग्यविषयक सोयीसुविधा आणि वित्तीय स्रोत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT