Crude Oil  sakal
ग्लोबल

Crude Oil : सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती 8 रुपयांनी वाढण्याची शक्यता

भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 60 टक्के पुरवठा ओपेक देश करतात म्हणून, भारतावर याचा परिणाम होणं साहाजिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

Crude Oil : कच्च्या तेलाच्या किंमतीसारख्या वाढत असतात. आता पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे साहजिकच सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे.

2 एप्रिल 2023 ला, ओपेक (OPEC – The Organization Of The Petroleum Exporting Countries) यांनी तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियाने ओपेक (OPEC) आणि ओपेकमध्ये नसणाऱ्या सदस्यांसाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 60 टक्के पुरवठा ओपेक देश करतात म्हणून, भारतावर याचा परिणाम होणं साहाजिक आहे. (Crude Oil likely to increase by 800 rupees per Barrels as OPEC Plus Announces Cut In Oil Production )

या निर्णया बद्दल काय म्हण्यात आलं ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने कुठल्याही देशाचं नाव न घेता सांगितलं “ही कपात काही ओपेक आणि गैर-ओपेक सदस्यांसह संयुक्तपणे केली जाईल. तेल बाजारात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे”.

मिंटमध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार, गुंतवणूक फर्म पिकरिंग एनर्जी पार्टनर्स म्हणाले, की ओपेक देशांच्या या निर्णयामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 800 रुपयांनी वाढू शकतात.

कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात झाली तर काय होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओपेक (OPEC) देशांनी प्रतिदिन साडे अकरा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल पंपावरील तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेस रिपोर्ट्सनुसार, मे २०२३ या वर्षापासून सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 5 लाख बॅरल कपात करणार आहे. याशिवाय इराक सहित UAE, कुवेत, अल्जेरिया आणि ओमान देखील तेल उत्पादनात कपात करणार आहेत.

या मोठ्या निर्णयामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिकाच्या संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ओपेक देशांमध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, व्हेनेझुएला आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT