Cyclone Biporjoy esakal
ग्लोबल

Cyclone Biporjoy : ...म्हणून तयार होते चक्रीवादळ?

समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन कहर कसा होतो, असे प्रश्न अनेकांना पडतात.

धनश्री भावसार-बगाडे

How Create A Cyclone : सद्यस्थितीत अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ निर्माण झालंय. हवामान खात्याचे म्हणणे आहे की त्याचा प्रभाव इतका असू शकतो की मोबाइल टॉवर उखडले जाऊ शकतात. खांब पडू शकतात. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत समुद्रात चक्रीवादळ निर्माण होऊन कहर कसा होतो, असे प्रश्न अनेकांना पडतात.

ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, समुद्रातून जमिनीवर उध्वस्त करणारे चक्रीवादळ एका विशेष परिस्थितीत तयार होते.

पृथ्वीच्या मध्यभागी विषुववृत्त आहे. म्हणजे इक्वेटर. त्याच्या उत्तरेला 23.5 अंशांवर कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे हे तुम्हाला माहिती आहे. शाळेतलं भूगालोचं पुस्तक आठवतंय? विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या या भागाला उष्णकटीबंधीय प्रदेश म्हणतात. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन.

इथं सूर्याची किरणं थेट पडत असल्यामुळं इथल्या समुद्राचं पाणी जास्त तापतं. आता पाणी जास्त तापलं की त्याची वाफ होते. गरम हवा, वाफ ही आपली जागा सोडून वरवर जाते हे तुम्हाला माहीत आहेच. आता ही हवा वर गेल्यामुळे समुद्राजवळ दाब कमी होतो.

हा कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्यावर आजूबाजूच्या प्रदेशातली हवा ती पोकळी जागा भरण्यासाठी येते.

ही प्रक्रिया सतत सुरू असते. म्हणजे कमी दाबाच्या केंद्राभोवती जास्त दाबाच्या प्रदेशातले वारे पिंगा घालू लागतात. हळुहळू या वाऱ्यांचा वेग आणि गती वाढत जाते आणि एक चक्र तयार होतं.

पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.

ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो. जसं दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT