death penalty will be given to a woman after 67 in usa
death penalty will be given to a woman after 67 in usa 
ग्लोबल

गर्भवतीचे पोट फाडून बाळाचे अपहरण करणाऱया महिलेला मृत्युदंडाची शिक्षा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : एका गर्भवती महिलेचे पोट फाडून बाळाचे अपहरण केलेल्या महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या महिलेला आठ डिसेंबर रोजी इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. अमेरिकेत शेवटी 1953 मध्ये एका महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. अमेरिकेत तब्बल 67 वर्षांनी एखाद्या महिलेला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची घटना घडत आहे.

लिसा माँटगोमेरी 2004 मध्ये कुत्रे खरेदी करण्याच्या बहाण्याने 23 वर्षीय बॉबी स्टीनेट यांच्या मिसोरी येथील घरी गेली होती. लिसा हिने आठ महिन्यांची गरोदर असलेल्या स्टीनेटचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर लिसा हिने स्टीनेटचे पोट फाडून बाळाचे अपहरण केले होते. पोलिसांनी तपासादरम्यान लिसाला ताब्यात घेतले होते. तिने मिसोरीच्या न्यायालयात गुन्हा कबूल केला. सुनावणीनंतर 2008 मध्ये न्यायालयाने अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात तिला दोषी ठरवले. लिसाच्या वकिलांनी सुनावणीवेळी ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत लिसाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, लिसाने अनेक संघीय न्यायालयांमध्ये निकालाला आव्हान दिले होते. मात्र, सर्व न्यायालयांनी तिची शिक्षा कायम ठेवली आहे. माँटोगोमेरीने वयाच्या 36 व्या वर्षी हे हत्याकांड केले होते. सध्या ती 52 वर्षांची आहे. गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी होती. तीन महिन्यांपूर्वी पुन्हा अमेरिकेत मृत्युदंडाला परवानगी मिळाली आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेली लिसा माँटगामेरी ही नववी कैदी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT