Bijing-Hongkong 
ग्लोबल

हाँगकाँगमध्ये स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हाँगकाँग प्रशासनाने घेतला निर्णय

पीटीआय

हाँगकाँग - नागरिकांचा विरोध असला तरी चीनच्या नियंत्रणाखालील हाँगकाँग प्रशासनाने नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. हाँगकाँगमध्ये स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्‍यकच होते, असे प्रतिपादन हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांनी आज केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वायत्तता देण्याच्या बोलीवर ब्रिटनने त्यांची वसाहत असलेल्या हाँगकाँगचा ताबा चीनकडे देण्याच्या घटनेला आज २३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॅरी लॅम यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे समर्थन केले. लॅम यांच्या भाषणा आधीच येथील लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी निषेध मोर्चा काढला होता.

कायद्याची अंमलबजावणी तातडीने
पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आंदोलकांना इशारा दिला आहे. हाँगकाँगला चीनपासून वेगळे करण्याची मागणी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे यात म्हटले आहे. तसेच, तिबेट आणि  तैवानला पाठिंबा देणेही गुन्हा मानले जाणार आहे. शाळा, सामाजिक संघटना, माध्यमे, संकेतस्थळे आणि इतर संस्था-संघटनांवर नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रविरोधी घटना कोणती हे ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

कायद्याअंतर्गत पहिली अटक
नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत हाँगकाँग पोलिसांनी आज एकाला अटक केली. निदर्शने करताना हाँगकाँगच्या स्वातंत्र्याची मागणी केल्याबद्दल त्याला ही अटक झाली असून या कायद्याअंतर्गत झालेली ही पहिलीच अटक आहे.

तैवानचा चीनला धक्का
चीनच्या अधिपत्याला आव्हान देणाऱ्या तैवानने चीनच्या नाकावर टिच्चून हाँगकाँगमधून स्थलांतर करणे सोयीचे जावे म्हणून कार्यालय स्थापन केले आहे. हाँगकाँगमधील गळचेपीविरोधात काही जणांनी तैवानमध्ये आश्रय घेण्याचे ठरविल्यास त्यांना मदत करण्यासाठी हे कार्यालय स्थापन केल्याचे तैवान सरकारने सांगितले. तैवान हा आमचाच भाग असल्याचा चीनचा दावा तैवानला अमान्य आहे.

असा आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा...
गुन्ह्याचे चार प्रकार

  • फुटीरतावाद : चीनचे विभाजन करण्याच्या हेतूने कृती करणे अथवा कट रचणे
  • विद्‌ध्वंसक कृती करणे : सरकारी इमारतींचे नुकसान करणे
  • दहशतवाद : सार्वजनिक सेवेचे नुकसान करणे, त्यावर हल्ला करणे
  • फितुरी : इतर देशांशी हातमिळवणी करून देशाच्या सुरक्षेला बाधा आणणे, चीन सरकारविरोधात प्रक्षोभ निर्माण करणे

गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा 

  • कमाल शिक्षा जन्मठेप
  • किंवा दहा वर्षांचा तुरुंगवास
  • किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास
  • किंवा दंड

कायद्यामुळे काय बदल होणार?

  • स्थानिक कायद्याला बांधिल नसलेल्या अधिकाऱ्यांना नेमणार
  • या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीवरील सर्व कारवाई चीन सरकारकडे शक्य
  • स्थानिक प्रशासन गुन्ह्याची प्रकरणे चीनकडे वर्ग करू शकणार
  • हाँगकाँगमध्ये वास्तव्यास नसलेल्या हाँगकाँगच्या नागरिकांनाही कायदा लागू
  • विना वॉरंट घरांची झडती घेणे, पुरावे गोळा करणे, फोन टॅप करणे, हेरगिरी करणे, सोशल मीडियावरून माहिती काढून टाकणे असे अधिकार पोलिसांना मिळणार
  • विदेशी कंपन्यांवर विशेष लक्ष ठेवता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT