Donald Trump 
ग्लोबल

Donald Trump: ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरुच; प्रतिस्पर्धी निक्की हेले यांना साऊथ कॅरोलिनात धक्का

Donald Trump decisive victory in the South Carolina : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी घौडदोड सुरुच ठेवली आहे

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी घौडदोड सुरुच ठेवली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार निक्की हेले यांचा साऊथ कॅरोलिनामध्ये पराभव केला आहे. विशेष म्हणजे निक्की हेले यांचा साऊथ कॅरोलिना हे 'होम स्टेट' आहे. त्यामुळे हेले यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय.(Donald Trump decisive victory in the South Carolina Republican primary blitzing rival Nikki Haley)

रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी निवडणुका सुरु आहेत. यात डोनाल्ड ट्रम्प आणि निक्की हेले हे तगडे स्पर्धक मानले जात आहेत. पण, डोनाल्ड ट्रम्प एक-एक पाऊल पुढे जात आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पच नक्की असतील. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी थेट जो बायडेन यांच्याशी लढत होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत चार राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. प्रत्येक विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक होत आहेत. दुसरीकडे निक्की हेले यांनी ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक तंदुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच दुसऱ्या वेळेस ट्रम्प निवडून आल्यास देशात अनागोंदी निर्माण होईल असं त्या म्हणाल्याआहेत.

२०१० मध्ये निक्की हेले या साऊथ कॅरोलिनाच्या प्रसिद्ध मेअर होत्या. त्या एकमेव महिला उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडून लढत आहेत. पण, त्यांना 'अमेरिका फस्ट' अजेंडा चालवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणे अवघड जात आहे. ट्रम्प यांच्यावर अनेक खटले भरण्यात आलेले आहेत. तरी उजव्या विजारसरणीच्या लोकांचा त्यांनाच पाठिंबा असल्याचं दिसत आहे.

अमेरिकेमध्ये नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी कंबर कसली आहे. पण, त्यांच्या वाढलेल्या वयाची अमेरिकेत चर्चा सुरु आहे. असे असले तरी अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT