Elon Musk
Elon Musk sakal
ग्लोबल

Elon Musk: खुप काळापासून मी शारीरिक संबंध ठेवलेले नाही, अफेअरच्या चर्चेवर मस्कचे उत्तर

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत असतो. सध्या गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन यांच्या पत्नीसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आले.

गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिनने त्यांची पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येताच इलॉन मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान यांचे गेल्या वर्षभरापासून अफेअर सुरू असल्याच्या बाबीला पुन्हा उधाण आले.यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली.

एलोन मस्क यांनी हे आरोप फेटाळून लावले एलॉन मस्क यांनी सर्जी ब्रिन आणि मी खुप चांगले मित्र आहोत आणि रात्री एकत्र पार्टीत होतो, असे म्हटले. मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदा भेटल्याचेही ते म्हणाले.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार एलॉन मस्क आणि सर्जी ब्रिन खूप छान मित्र आहेत. मस्क खुप काळापासून ब्रिन यांच्या सिलिकन वॅली येथे असलेल्या घरी सातत्याने येत जात असतात. मागील वर्षी मस्क और ब्रिन यांची पत्नी निकोल शनहान यांच्यात अफेयर सुरू झाले.

सप्टेंबर 2021 मध्ये मस्कचे सिंगर ग्रिम्ससोबत ब्रेकअप झाल्यानंतर हे अफेअर सुरू झाल्याचे बोलले जाते मात्र मस्कने यावर बोलताना हे सर्व आरोप फेटाळले आणि म्हणाले की खुप काळापासून मी लैगिंक संबंध ठेवलेले नाही. सर्गे ब्रिनसोबतच्या पार्टीत त्याने नुकताच घेतलेला स्वतःचा फोटो अपलोड केला. आपल्यावरील असे आरोप वाचून निराश झाल्याचेही तो म्हणाला.

ब्रिन आणि निकोलची भेट एका लग्नात झाली होती

२०१५ मध्ये ब्रिनला भेटण्याआधी निकोल एका फायनान्स एक्झिक्यूटिवची बायको होती. ब्रिन आणि निकोलला एका डेटिंग अॅप सीईओच्या लग्नात पहिल्यांदा सोबत स्पॉट केल्या गेलं होतं. ३३ वर्षाची निकोल एकून ५० मीलियन डॉलरची मालकीण आहे.

ब्रिनने जानेवारीमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मस्क आणि शनहानच्या अफेअरबद्दल कळताच त्याने घटस्फोटाची मागणी केल्याचं जर्नलने सांगितलं होतं. मात्र ब्रिनने याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर शनहाननेही याविषयावर बोलणं टाळलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT