alcohol 
ग्लोबल

दारु आणि इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ब्रिटनमध्ये झालं संशोधन

सकाळ डिजिटल टीम

लंडन - दारुच्या नशेत लोक कधी काय बोलतील किंवा काय करतील हे सांगणं थोडं कठीणच. गंमतीनं असंही म्हटलं जात की दारु प्यायल्यावर इंग्रजी फाडफाड बोलायला सुरुवात होते. जे दारु न पिता इंग्रजी येत असून बोलताना अडखळतात ते नशेत मात्र धडाधड बोलत सुटतात. आता यावर चक्क संशोधन झालं आहे. एखादी व्यक्ती नशेत असते तेव्हा दारु न पिता जितकं इंग्लिश बोलू शकतो त्यापेक्षा सहज बोलतो असं दिसतं. संशोधनातून अशी माहिती समोर आलीय की दारुच्या नशेत इतर भाषा शिकताना मदत होते. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, ब्रिटनमधील एका कॉलेजने आणि नेदरलँडसच्या युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिचमध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं. 

संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की, लिग्विस्टिक प्रोफिसिएन्शी दारुच्या नशेमुळे वाढते. यामध्ये डच भाषा शिकणाऱ्या 50 जर्मन लोकांच्या एका गटाची संशोधनासाठी निवड करण्यात आली होती. यापैकी काही लोकांच्या पेयामध्ये कमी प्रमाणात अल्कोहल मिसळलं तर काही लोकांना नॉर्मल ड्रिंक देण्यात आलं होतं. 

दारु मिसळलेलं ड्रिंक प्यायल्यानंतर जर्मन लोकांच्या गटाला नेदरलँडमधील लोकांसोबत डच भाषेत बोलण्यास सांगितलं. यातून अशी गोष्ट समोर आली की ज्या लोकांच्या ड्रिंकमध्ये अल्कोहल होतं त्यांनी शब्द स्पष्ट उच्चारले. विशेष म्हणजे वेगळ्या भाषेत बोलत असताना जराही अडखळले नाहीत. 

लोक  दारुच्या नशेत सहजपणे डच भाषेत बोलत होते. या लोकांना थोड्या प्रमाणात अल्कोहल देण्यात आलं होतं. लोकांना कमी प्रमाणात दारु प्यायला दिल्यानंतर असे निष्कर्ष समोर आले आहेत. लोकांना त्यांची मातृभाषा वगळता इतर भाषेमध्ये बोलणं सर्वसामान्यपणे कठीण असतं. दारु प्यायल्यानं जरी एखाद्या भाषेचं अपुरं ज्ञान असलं तरी ती भाषा येत असल्याच्या अविर्भावात व्यक्ती नशेमुळे बोलते. मात्र दारुमुळे आरोग्यावर दुष्परिणामही होतात. स्मरणशक्ती आणि एकाग्रता यावर वाईट परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT