ethopia 
ग्लोबल

पवित्र संदूक वाचवण्यासाठी धावले, 800 भाविकांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अदीस अबाबा - इथोपियामध्ये एका पवित्र अशा Ark of covenant ला वाचवण्यासाठी शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत. इथोपियातील तिगरे क्षेत्रात सेंट मेरी चर्चमध्ये कडक सुरक्षा रक्षकांच्या कवचात ही 'संदूक' ठेवली जाते आणि ख्रिश्चन धर्मात ही खूपच पवित्र अशी मानली जाते. इथोपियामध्ये सेंट मेरी चर्चजवळ तब्बल 800 लोकांना मारण्यात आलं असून अनेक दिवस त्यांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते असं वृत्त तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. 

गेटू माक नावाच्या एका लेक्चररने सांगितलं की, इथली परिस्थिती खूपच भयानक आहे. जेव्हा लोकांनी गन फायरिंगचा आवाज ऐकला तेव्हा ते चर्चच्या दिशने धावले. त्याठिकाणी असलेल्यांना मदत करता येईल. तिथल्या पवित्र पेटीची सुरक्षा करता येईल हा त्यांचा उद्देश होता. मात्र यामध्ये अनेक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

इथोपियात ही घटना नोव्हेंबरमध्ये घडली होती आणि तेव्हा पंतप्रधान अॅबे अहमद यांनी इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर इथोपियाचा जगाशी असलेला संपर्क बंद झाला होता. आता इंटरनेट हळू हळू पुर्ववत केलं जात आहे. माक यांनी म्हटलं की, नोव्हेंबरमध्ये या भागात तणावाचं वातावरण होतं. तसंच लोकांच्या मनात भीतीही होती की पवित्र अशा पेटीला इतर शहरात नेलं जाईल आणि ती नष्टही केली जाईल. हल्लेखोरांनी कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता आडवं येणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. 

अहमद सत्तेत येण्याआधी इथोपियामध्ये 27 वर्षे तिगरे पीपुल्स लिबरेशन आर्मीची सत्ता होती. तिगरे भागातील लोकसंख्या ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के इतकी आहे. मात्र या भागातील लोकांचे राष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व राहिलं आहे. पण यांची सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

इथोपियाचे पंतप्रधान अॅबे अहमद यांनी तिगरे भागात लष्कारच्या एका तळावर हल्ल्यानंतर या भागात लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पंतप्रधानांनी लष्कराला दिलेल्या आदेशानंतर तिगरे भागातील प्रमुख पक्षाने तिथल्या सुरक्षा दलांना लष्कराच्या चौकीवर ताबा मिळवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक दलांनी लष्कराची शस्त्रे ताब्यात घेऊन सैनिकांना बंदी बनवलं होतं. त्यानंतर देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसंच कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT