ग्लोबल

'भारताविरोधात राजकीय प्रयत्न; प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार'

विनायक होगाडे

सध्याच्या संसर्गाच्या काळात भारत प्रचंड तणावातून जात आहे, असेही जयशंकर म्हणाले.

न्यूयॉर्क : भारत सरकारबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ‘राजकीय प्रयत्न’ सुरु असून जगभरात सांगितली जाणारी भारतातील राजकीय स्थिती आणि प्रत्यक्ष स्थिती यात मोठा फरक असल्याचा दावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केला आहे. सध्याच्या संसर्गाच्या काळात भारत प्रचंड तणावातून जात आहे, असेही जयशंकर म्हणाले. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांनी काल (ता.२६) हूव्हर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केलेल्या, ‘भारत : संधी आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात सहभाग घेतला होता. यावेळी जयशंकर म्हणाले,‘‘आम्ही सध्या ८० कोटी जनतेला मोफत अन्न देत आहोत. गेल्या वर्षी अनेक महिने हे काम केले आणि आता दुसऱ्या लाटेतही ती मोहिम राबविली जात आहे. आम्ही ४० कोटी लोकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे भरले. हे भारत सरकार करत आहे. ()

आम्ही सध्या अमेरिकेच्या तुलनेत अडीच पटीने असलेल्या लोकसंख्येला अन्न पुरवतो आणि अमेरिकेच्या लोकसंख्येहून अधिक प्रमाणातील जनतेला पैसे देतो आणि तरीही हे सर्व फारसा गाजावाजा न करता केले जाते. हे करताना कोणताही दूजाभाव बाळगला जात नाही. या वास्तवाकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, जगभरात निर्माण केली गेलेली भारताची राजकीय प्रतिमा आणि प्रत्यक्षातील स्थिती यामध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे आमच्या सध्याच्या सरकारची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी राजकीय पातळीवर ठाम प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.’’

दहशतवाद अमान्यच

दहशतवाद किंवा त्याचा राजकीय अस्त्र म्हणून होणारा वापर भारताला कदापिही मान्य नाही, असे जयशंकर यांनी या चर्चासत्रात स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तानात सध्या शस्त्रसंधीचे काटेकोर पालन होत असले तरी त्याहूनही अधिक महत्त्वाचे प्रश्‍न सोडविणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

भेटीगाठींचा दिवस

परराष्ट्रमंत्री एस . जयशंकर हे न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला आले असून ते येथे अमेरिकेच्या अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. बायडेन प्रशासनाच्या शंभर दिवसांमधील भारत-अमेरिका संबंधांचाही ते आढावा घेणार आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची ते भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT