Pakistan Taliban Clash 
ग्लोबल

Pakistan Taliban Clash : पेशंटला एन्ट्री दिली नाही म्हणून तालिबानी चिडले, पाकिस्तानवर जबरदस्त गोळीबार!

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तान आणि तालिबानमध्ये वाद वाढत चालला आहे. तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांवर सतत भयंकर हल्ले करत आहेत. तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तानसोबतची तोरखाम सीमा बंद केली आहे. तोरखाम ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील प्रमुख व्यापारी सीमा आहे. पाकिस्तान आपले आश्वासन पूर्ण करत नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. 

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार तालिबानच्या आयुक्तांनी सांगितले की, पाकिस्तानने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आमच्या नेतृत्वाच्या आदेशाने आम्ही तोरखाम सीमा बंद केली आहे. अफगाणिस्तानमधील नागरीकांनी पूर्व नांगरहार प्रांतातील सीमा चौकीवर जाणे टाळावे. 

पाकिस्तानने अफगाण नागरिकांना उपचारासाठी येण्यास मज्जाव केल्याने तालिबान संतापला आहे. त्यामुळे त्यांनी संतापून तोरखाम सिमा बंद केली. या मार्गाने मध्य आशियातील देशांमध्ये व्यापार करणाऱ्या पाकिस्तानलाही मोठा फटका बसला आहे. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते कहर बल्खी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल यांना इशारा देताना म्हटले आहे की, 'जगातील अनेक देशांपेक्षा अफगाणिस्तानची सुरक्षा उत्तम आहे.'

तसेच ड्युरंड लाईनवर पाकिस्तान आणि तालिबानमध्ये जोरदार गोळीबार झाला. स्थानिक लोकांनी गोळीबार झाल्याची पुष्टी केली आहे. या गोळीबार धोकादायक शस्त्रांचाही वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान आणि तालिबानमधील संबंध बिघडले असल्याचे पाकिस्तावनी मीडियाने स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी तोरखाम सीमेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT