five people were killed injured after a passenger train in Bangladesh was allegedly set on fire before election knp94 
ग्लोबल

Bangladesh Train: निवडणुकीपूर्वी बांगलादेशमध्ये हिंसा; रेल्वेला लावलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू

Train in Bangladesh was allegedly set on fire: बांगलादेशमध्ये दोन दिवसांत निवडणुका होणार आहेत. त्यातच एक मोठी घटना घडली आहे. काही दंगलखोरांनी प्रवाशी रेल्वेला आग लावून दिली आहे.

कार्तिक पुजारी

ढाका- बांगलादेशमध्ये रविवारी निवडणुका होणार आहेत. त्यातच एक मोठी घटना घडली आहे. काही दंगलखोरांनी प्रवाशी रेल्वेला आग लावून दिली आहे. त्यात किमान ५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.( least five people were killed and many others were injured after a passenger train in Bangladesh was allegedly set on fire)

शुक्रवारच्या रात्री बेनापोले एक्स्प्रेसला राजधानी ढाकाच्या गोपीबाग भागात ही आग लावण्यात आली आहे. बांलदेशच्या सार्वत्रिक निवडणुका दोन दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी भाग न घेण्याचा निर्णय घेतला असून यावर बहिष्कार टाकला आहे. यातून निर्माण झालेल्या अशांततेतून हा हिंसाचार झाल्याचं सांगण्यात येतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास गोपीबाग भागात रेल्वेला आग लावण्यात आली. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दाव्यानुसार, रेल्वेमधील अनेक प्रवाशी भारतीय नागरिक होते. आगीच्या घटनेमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, काही दंगलखोरांनी रेल्वेच्या पाच डब्ब्यांना आग लावली. त्यानंतर आग आणखी चार डब्यांमध्ये पसरली. आणखी काही लोक डब्यांमध्ये अडकल्याची भीती आहे. रेल्वे ढाका ते बेनापोले येथे जात होती. बांगलादेशमध्ये रविवारी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. प्रमुख विरोधी पक्ष बांदलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT