Russia-Ukraine War
Russia-Ukraine War esakal
ग्लोबल

Donald Trump : ..तर तिसरं महायुद्ध पाहायला मिळणार; रशिया-युक्रेन युद्धाबाबत ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्धाबाबत (Russia-Ukraine War) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते एका दिवसात हे विनाशकारी युद्ध संपवू शकतात, असा दावा त्यांनी केलाय.

ट्रम्प यांनी शनिवारी 'कंझर्वेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स' (CPEC) मध्ये केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं. यावेळी 2024 ची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (US Presidential Election) लढवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.

आपल्या रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. गार्डियनच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 मिनिटांचं भाषण केलं. रशिया-युक्रेन युद्ध वेळेवर न संपल्यामुळं तिसऱ्या महायुद्धाबाबतही ते बोलले. मात्र, आपण असं होऊ देणार नसल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प म्हणाले, युद्ध सोडवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझी चांगली भेट होईल आणि ते माझं नक्कीच ऐकतील. अमेरिकेनं अफगाणिस्तानातून माघार न घेतल्यामुळं ऑगस्ट 2021 मध्ये रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं.

जलद पावलं उचलली नाहीत तर तिसरं महायुद्ध पाहायला मिळणार आहे. मात्र, मी एकमेव उमेदवार आहे जो हे तिसरं महायुद्ध थांबवू शकतो. मी ओव्हल ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी रशिया आणि युक्रेनमधील विनाशकारी युद्ध संपवून टाकेन. तिथं काय बोलावं ते मला चांगलं माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. आपल्या देशाच्या इतिहासातील ही सर्वात धोकादायक वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT