Mass protests erupt in France as police forces are deployed in large numbers to maintain law and order.

 

esakal

ग्लोबल

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Mass protests erupt in France : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल आठ हजार पोलिस तैनात

Mayur Ratnaparkhe

France streets protest : नेपाळमध्ये झालेल्या प्रचंड उलथापलथीनंतर आता फ्रान्सही पेटलं आहे. फ्रान्सच्या रस्त्यांवर सध्या जोरदार निदर्शने सुरू आहेत, तर मोठ्याप्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे दिसत आहे. एकूणच सद्यस्थितीस फ्रान्समध्ये रस्त्यावर अराजकता आणि संसदेत अस्थितरता निर्माण झालेली आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरीससह अनेक मोठ्या शहरांमध्ये बुधवारी सकाळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड संघर्ष उफाळला. ब्लॉक एव्हरिथिंग या नावाने सुरू झालेल्या या आंदोलनामुळे देशाची संपूर्ण परिवहन व्यवस्था विस्कळीत करून टाकली आहे. केवळ पॅरीसमध्येच २०० पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे.

चेहरा झाकलेल्या आंदोलकांनी जागोजागी मोठमोठे कचऱ्याचे ड्रम आणि बॅरिकेड्स लावून रस्ते जामा केले आहेत. बरदॉ आणि मार्सिले सारख्या शहरांमध्ये तर जमावाने चौकांना घेरलं आहे. पोलिसांवर बाटल्या फेकल्या जात आहेत. एवढंच नाहीतर पॅरीसमधील गारे दू नॉर रेल्वेस्टेशनलाही आंदोलकांनी निशाणा बनवलं आहे.

पोलिसांची म्हणणे आहे की, अटक करण्यात आलेले बहुतांश लोक हे सार्वजनिक व्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय अशीही भीती व्यक्त केली गेली आहे की, जसजसा दिवस मावळेल तसे हे आंदोलन अधिक चिघळू शकते, जमाव अधिक वाढवू शकतो. हे आंदोलन अशावेळी सुरू झाले आहे, जेव्हा राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी अवघ्या २४ तासांपूर्वीच देशाचे नवीन पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती केली आहे.

लेकोर्नू यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावास सामोरे गेलेल्या माजी पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांची जागा घेतली आङे. बायरो यांना सोमवारी रात्री राजीनामा द्यावा लागला होता. बायरो यांनी देशाचे कर्ज कमी करण्यासाठी जवळपास ३.७लाख कोटी रुपयांची कपात योजना सादर केली होती, परंतु त्यांचा हा निर्णय जनतेला पटला नाही आणि त्यांचे सरकार कोसळले. आता संपूर्ण फ्रान्समध्ये वातावरण बिघडत चाललं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ८० हजार पेक्षा अधिक पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

Parner News : गडरक्षण हीच खरी शिवसेवा! खासदार छत्रपती शाहु महाराज

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

SCROLL FOR NEXT