Protesters in France holding banners during the ‘Block Everything’ movement demanding political changes and questioning President Macron’s leadership.

 

esakal

ग्लोबल

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

France protests : सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ८० हजारांहून अधिक जवान रस्त्यावर उतरवले गेले आहेत.

Mayur Ratnaparkhe

France Unrest: Why the Protests Erupted: नेपाळपाठोपाठ आता फ्रान्सही पेटला आहे. फ्रान्समध्येही सरकारविरोधात आक्रमक निदर्शने सुरू झाली आहेत. राष्ट्रपती मॅक्रो यांचा निषेध नोंदवत लाखोंच्या संख्येत लोक रस्त्यावर उतरली आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरीससह प्रमुख शहरांमधील रस्ते आंदोलकांनी ठप्प केले आहेत. जागोजागी जाळपोळ आणि दगदफेक सुरू आहे आणि हे सर्व ‘Block Everything movement’ अंतर्गत सुरू झालं आहे.

तर सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ८० हजारांहून अधिक जवान रस्त्यावर उतरवले गेले आहेत. एकूणच फ्रान्समध्ये सध्या प्रचंड अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवर आपण हे आंदोलन नेमकं का सुरू झालं, Block Everything movement नेमकी काय आहे आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो हे राजीनामा देणार का?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

फ्रान्समध्ये का भडकला हिंसाचार? –

खरंतर फ्रान्समधील लोक राष्ट्रपती मॅक्रो यांच्या धोरणांवर प्रचंड नाराज आहेत आणि याच्याविरोधातच ते आता थेट रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, मॅक्रो सरकारकडून एकही असं काम केलं गेलं नाही, ज्यामुळे सर्वसामान्यांचं जीवनमान सुधारू शकेल. त्यांचे अर्थ व्यवस्थापनही प्रचंड खराब आहे.

फ्रान्समधील जनतेचा संताप तेव्हा अनावर झाला, जेव्हा माजी पंतप्रधान फ्रांस्वा बायरू यांनी अर्थसंकल्पात ५० अब्ज डॉलर पेक्षा जास्त कपातीचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या प्रस्तावात दोन नॅशनल हॉलिडे रद्द करणे, २०२६ मध्ये पेन्शनवर रोक लावणे आणि आरोग्य सेवा खर्चात अब्जो डॉलरची कपात करण्याचा समावेश होता. यामुळे फ्रान्समधील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. कारण, हा प्रस्ताव म्हणजे वर्क कल्चरविरोधात आणि आरोग्याशी केली जाणारी हेळसांड वाटू लागला. शिवाय, सरकारकडून मिळणाऱ्या सेवांपासून वंचित ठेवले जाणार असल्याचाही आऱोप केला गेला.

'Block Everything'  म्हणजे नेमकं काय? -

 फ्रान्समध्ये या आंदोलनाची सुरूवात सोशल मीडियावर विरोधी डाव्या आघाडीने केलेल्या 'Block Everything' या आवाहनाने झाली. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅरीसमध्ये हिंसाचार उफाळला.

मॅक्रो यांच्या राजीनाम्याची मागणी -

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्याकडून पंतप्रधान पदासाठी आपल्या नव्या उमेदवाराची घोषणा झाल्याच्या एक दिवसानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि अशांतता निर्माण झाली. आंदोलकाकांडून थेट मॅक्रो यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली जात आहे. फ्रांकोइस बायरू हे पदावरून हटल्यानंतर राष्ट्रपती मॅक्रो यांनी आपली निकटवर्तीय असलेल्या सेबेस्टियन लेकोर्नु यांना फ्रान्सचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. यानंतर फ्रान्समध्ये प्रामुख्याने पॅरीसमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराने प्रचंड नुकसान केले. रस्ते रोखले गेले, बस पेटवल्या गेल्या आणि दगडफेकही केली गेली. शिवाय, रेल्वे आणि विद्यूत विभागाचेही मोठे नुकसान झाले. या दरम्यान गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०० जणांना अटक करण्यात आली आहे.

फ्रान्सचे गृहमंत्री ब्रूनो रिटेलो यांनी या आंदोलनाची कडक शब्दांत निंदा केली आणि आरोप केला आहे की, आंदोलक देशात विद्रोहाचे वातावरण निर्माण करू इच्छित आहेत. संपूर्ण फ्रान्समध्ये जवळपास ८० हजार सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, ज्यापैकी सहा हजार पॅरीसमध्ये तैनात आहेत.

राष्ट्रपती मॅक्रो राजीनामा देणार का? –

फ्रान्समध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या अशांतते नंतरही मॅक्रो यांनी स्पष्ट केले आहे की, ते राजीनामा देणार नाहीत. उलट त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधक हे केवळ सत्तेसाठी हापलेले आणि बेजबाबदार आहेत, असं मॅक्रो यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT